राहाता (प्रतिनिधी)-
अहिल्या नगर जिल्हा बँकेच्या चेअरमन पदी डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांची निवड झाली आहे. तर व्हा. चेअरमन म्हणून संगमनेरचे रणजीत सिंह देशमुख यांची निवड झाली आहे. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांची चेअरमन पदी निवड होताच राहता तालुक्यात जल्लोष करण्यात आला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये फटाक्यांची अध्यक्षपदी व पेढे वाटून डॉक्टर सुजय दादा विखे पाटलांचा जयजयकार करण्यात आला.
जिल्ह्याच्या राजकारणात परस्परविरोधी विचारधारेच्या नेत्यांना सहकाराच्या एकाच व्यासपीठावर आणत नवी समीकरणे जुळविणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची वर्णी लागली आहे. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी ही निवड प्रक्रिया पार पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात अनोखा समन्वय साधला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे या चार प्रमुख राजकीय शक्तींना एकत्र आणण्यात डॉ. विखे यांची भूमिका निर्णायक ठरली. निवडणुकीत केवळ जागांचे गणित न मांडता, स्थानिक पातळीवरील मतभेद चर्चेतून सोडवून त्यांनी ही निवडणूक राजकीय वर्चस्वाची लढाई न राहू देता 'सामूहिक नेतृत्वाची प्रक्रिया' बनवली.
जिल्हा बॅकेच्या २१ संचालक मंडळाच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख यांच्या ‘सहकार विकास आघाडी'ने १७ जागा जिंकून आपले वर्चस्व सिध्द केले होते. त्यानंतर अकोले येथील अपक्ष संचालिका संजीवनी शिंदे यांनी आघाडीला पाठिंबा दिल्याने हे संख्याबळ १८ वर पोहोचले. निवडीच्या दिवशी सकाळी झालेल्या बैठकीत सभापती प्रा. राम शिंदे गटाचे दोन संचालक सचिन घुमरे आणि ज्योती प्रकाश शिंदे यांनीही डॉ. विखे व देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. परिणामी, २१ पैकी २० संचालकांचे भक्कम पाठबळ मिळाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड एकमताने पार पडली.या ऐतिहासिक निवडीप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सभापती राम शिंदे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक शंकरराव गडाख, अक्षय कर्डिले, बिपीन कोल्हे, मोनिका राजळे, राजश्री घुले, करण ससाणे, दत्ता पानसरे, सचिन जगताप, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, अनुराधा नागवडे, संगीता वाघ, कारभारी जावळे, गणपतराव सांगळे, वैभव पिचड, संजीवनी शिंदे, सचिन घुमरे आणि ज्योती प्रकाश शिंदे उपस्थित होते.
दरम्यान युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांची जिल्हा बँकेचे चेअरमन पदी निवड झाल्यानंतर राहता तालुक्यात जल्लोष करण्यात आला. राहता तालुक्यातील अनेक गावांमध्ये या निवडीची वृत्त येताच फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचे तालुक्यातून सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments