टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान येथील दै, पुण्यनगरी, दै, मराठवाडा केसरी ,वेद न्यूज चैनल, एस न्यूज चैनल, सत्तेचा महासंग्राम , व लोक1 न्यूज चैनलचे प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव लोखंडे, यांच्या वाढदिवसाचे अवचित साधन, व दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन दिलीप लोखंडे ,मित्र मंडळाच्या वतीने टाकळीभान येतील अपंग व गरजू कुटुंबांना दिपावली सणाला किराणा वाटप करून दिपावली गोड करण्यात आली,
यावेळी किराणा वाटप करताना ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे,ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष अर्जुन राऊत, टाकळीभान सेवा सोसायटीचे माजी संचालक भैया पठाण, साई संस्थांचे कर्मचारी अनिल राव लोखंडे, फायनान्स कंपनीचे बाळासाहेब सावंत, अशोकराव शेंडे, सुनील रणनवरे यांच्या समवेत वाटप करण्यात आले,
0 Comments