सेव संकल्प अभियानांतर्गत सावळीविहिर कृषी संशोधन केंद्र व कृषी विभागाच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण उत्साहात संपन्न.




शिर्डी ( राजकुमार गडकरी)- राहाता तालुक्यातील कृषी संशोधन केंद्र सावळीविहीर फार्म व कृषी विभाग, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेवा संकल्प अभियान अंतर्गत माहेगाव देशमुख ता.कोपरगाव येथे नुकताच शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. सदर प्रशिक्षण वर्गात डॉ पी.एस.बेल्हेकर (अधिकारी ,कृषी संशोधन केंद्र सावळीविहीर फार्म)यांनी पावसाच्या खंड काळात पिकांची नियोजन, तसेच रब्बी हंगामात गहू,हरभरा, तेलबिया पिकांचे नियोजन बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच नव्याने विकसित केलेल्या सुर्यफुलाचे, फुले अर्णव, संकरित वाणाची शेतकरी बांधवांना माहिती दिली


 निफाड संशोधन केंद्राचे सहायक प्रा. डॉ पी.पी.खंडागळे यांनी कांदा पिकाचे उत्पादन बाबत माहिती दिली . श्रीमती टि.वाय.मोटे मंडल कृषी अधिकारी कोळपेवाडी, यांनी महीलासाठी कृषी विभागाच्या योजना तसेच शेतकरी महीलांना उपयुक्त मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाचे पी.जी. जाधव( कोपरगाव उपकृषी अधिकारी) यांनी कार्यक्रमाचे संचालन व सतिश पद्माने( सहाय्यक कृषी अधिकारी कोपरगाव) यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. सदरच्या कार्यक्रमात कृषी संशोधन केंद्र सावळी विहीर फार्मच्या विक्री केंद्रांत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विद्यापीठाच्या विविध उत्पादनांची माहिती कृषी सहाय्यक श्रीमती स्वप्नाली दातीर यांनी दिली व‌ शेतकरी बांधवांना विद्यापीठांचे फुले मायक्रो ग्रेड हे उत्पादन जागेवर उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब भगुरे व संदिप भगुरे यांच्या फार्म हाऊसवर करण्यात आले होते . या कार्यक्रमात सावळीविहीर सह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments