राहाता तालुका प्रतिनिधी
केंद्र सरकारने रब्बी पिकांच्या एम एस पीत तुटपुंजी वाढ करून दुष्काळात शेतकऱ्याचा घात केला असल्याचा अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्धारे खुलासा केला आहे पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे की यावर्षी दुष्काळाने खरीप पिके जळाली तसेच रब्बी हंगामात पुरेशे पाणी नाही शेतीचा उत्पादन खर्च बियाणे खते औषधे मजुरीचे दर पाच पट वाढले .आणि यावर्षी केंद्र सरकारने गहू पिकाला व्किंटलला 25 रूपये वाढ 2610 रुपये हरभरा वाढ 83 रूपये 5928 बाली॔ 136 रुपये 2285 असी तुटपुंजी एम एसपीत वाढ दाखवली केंद्र सरकार राज्य सरकार हे पुर्ण शेतकरी विरोधी भुमीका घेते यात बहुतेक लोकप्रतीनिधी शेतकरी असल्याचे दावे करतात मग यांना ही एम एसपी चुकीचे आहे हे का सांगत नाही या यंत्रेनेमध्ये कृर्षी मुल्य आयोगात यांच्याच पक्षाचे बगलबच्चे प्रतीनीधी असतात त्यांना लाखो रूपये मानधन देतात त्यांना गहू पिंकाचा व इतर शेतमालाला उत्पादन खर्च किती येतो हे माहीत नाही का असा सवाल विठ्ठलराव शेळके यांनी केला आहे शिवाय यावर्षी जगामध्ये साखरेचा तुटवडा असल्याने साखर शंभर रुपयेवर जाईल असे असताना शेतकरी संघटनेने पाच हजार रूपये प्रती टन भावाची मागणीसाठी राज्यात व आम्ही जिह्यात अंदोलन करत आहे शिवाय साखर टेंडर हे प्रती व्किंटल 5500 रूपये पैक्षा विकू नये असे असताना साखर कारखानदार देखील मुग गिळून आहेत तरी शेतकऱ्यांनी जागृत होऊन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संघटित व्हावे असे मत विठ्ठलराव शेळके यांनी मांडले आहे
0 Comments