राजस्थान येथून मागविण्यात आलेल्या या पांढऱ्याशुभ्र संगमरवरी शिळांवर मराठी व हिंदी भाषेत श्री साईबाबांची वचने कोरून त्यांना सुवर्ण मुलामा देण्यात आला आहे.
या प्रत्येक शिळेचे वजन अडीच टन असून, तिन्ही शिळांचे एकूण वजन साडेसात टन आणि किंमत सुमारे २७ लाख रुपये असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
या शिळा मंदीर परिसर व श्री साई प्रसादालय या ठिकाणी बसविण्यात आलेल्या असून देणगीदार साईभक्ताच्या विनंतीवरून त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
0 Comments