महात्मा गांधी संकुलात जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन



लोहगाव (वार्ताहर) प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती प्राचार्य दिलीप डहाळे यांनी दिली.
 विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित या वकृत्व स्पर्धा दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न होणार आहेत. 

या स्पर्धेसाठी अ गटात उत्सव आनंदाचे की आवाजाच्या कर्दनकाळाचे?, कृत्रिम बुद्धिमत्ता :शाप की वरदान, आरक्षण :सामाजिक न्याय की राजकीय शस्त्र?, रयत शिक्षण संस्था :बहुजन समाजाच्या उद्धाराची गंगोत्री तर ब गटात सोशल मीडिया :माहितीचा महापूर की मानसिक आरोग्य, पर्यावरण संवर्धन काळाची गरज, वाचन संस्कृती आणि आपण, डिजिटल भारत: सायबर सुरक्षितता ही विषय आहेत. या स्पर्धेसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दुग्धयोगी रावसाहेब म्हस्के पाटील यांच्यातर्फे प्रथम क्रमांकास पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ. पी.बी. कडू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्यातर्फे द्वितीय क्रमांकास चार हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, माजी आमदार चंद्रकांतदादा घोगरे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकनाथ घोगरे पाटील यांच्यातर्फे तृतीय क्रमांकास तीन हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, माजी विद्यार्थी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल चौधरी यांच्यातर्फे उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास प्रत्येकी एक हजार रुपये व स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र तर स्व. शहाजी अनाप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माजी प्राचार्य मधुकर अनाप यांच्यातर्फे विजयी संघास महात्मा गांधी फिरता चषक देण्यात येणार आहे. उपस्थित सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी या स्पर्धेसाठी दोन विद्यार्थ्यांचा एक संघ पाठवावा, असे आवाहन मुख्याध्यापिका नलिनी जाधव, प्र. उपप्राचार्य संजय डुबे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे यांच्यासह समितीतील सदस्यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी समन्वयक डॉ. शरद दुधाट, ९८३४१३२१३८ यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित केले आहे.

Post a Comment

0 Comments