सोयगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या डिजे वर प्रादेशिक परिवहन विभागाची दंडात्मक .




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२५-- सोयगाव पोलिस ठाण्यात दि.२४ गुरुवारी रात्री एक डिजे सायंकाळी दुरक्षेत्र बनोटी येथे एक डिजे अशा दोघा डिजे वर सोयगाव पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतले होते. 

 सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी डिजे संदर्भात प्रादेशिक परिवहन विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक शिवशंकर ज्ञानदेव कातडे यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन दंडात्मक कारवाई केली.या कारवाईमुळे मंडळ व डिजे धारकांनी धसका घेतला आहे.
         याबाबत सविस्तर माहिती अशी, दि.२४ गुरुवारी रात्री ०१:४३ वाजता आयशर वाहन क्रमांक एमएच ३१ सीबी ८०९३ या वाहनाचा चालक शुभम ज्ञानेश्वर साळवे वय २४ वर्षे रा. मोढा खु. ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर व गुरुवारी रात्री ११:४१ वाजता टाटा ४०७ एम एच ०४ एजी ६०७५ या वाहनाचा चालक विकास भोजराज जाधव वय २४ वर्षे रा. ओहार ता. चाळीसगाव जि.जळगाव यांच्यावर सोयगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी प्रादेशिक परिवहन विभागाशी केलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभाग छत्रपती संभाजीनगर, मोटार वाहन निरीक्षक शिवशंकर ज्ञानदेव कातडे यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन डीजे आयशर वाहन क्रमांक एमएच ३१ सीबी ८०९३ याला तीस हजार रुपये तर टाटा ४०७ एम एच ०४ एजी ६०७५ याला तीस हजार पाचशे रुपये दंडात्मक कारवाई केली. दोघांनी दंड भरल्याने ६०५००/- रुपये शासन जमा झाले आहे. या दंडात्मक कारवाई मुळे मंडळ व डीजे धारकांनी धसका घेतला आहे. सोयगाव पोलीस ठाण्याअंतर्गत डिजे,डॉल्बी, लेझर दिवे व ध्वनी प्रदूषमुक्त विसर्जन मिरवणुका होतील हे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments