शिर्डी बसस्थानक परिसरात महिलेचे ४५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; दोघे ताब्यात




शिर्डी पोलिसांची तत्पर कारवाई; चोरीचा मुद्देमाल हस्तगत!

शिर्डी ( प्रतिनिधी)-
शिर्डी पोलीस ठाणे हद्दीतील बसस्थानक परिसरात एसटी बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा शिर्डी पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून सुमारे ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, डोरेले, मणी हस्तगत करण्यात आली आहे.
दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासा दरम्यान पोलिसांनी संशयितांचा शोध घेत गणेश ऊर्फ प्रभा (कल्ल्या) अशोक लोंढे, वय ३६ वर्षे, रा. चितळी, ता. राहाता, हल्ली मु. साई चौक, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर तसेच मंगल नारायण गायकवाड, वय ४० वर्षे, रा. चितळी, ता. राहाता, हल्ली मु. साई चौक, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत संशयितांनी दि. २० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता शिर्डी बसस्थानकासमोरील फलाट क्रमांक २ येथे एसटी बसमध्ये चढताना सोन्याची पोत चोरी केल्याची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर आरोपींची पोलीस कोठडी घेऊन चौकशी करण्यात आली आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रणजित गलांडे, पोलीस अधिकारी सपोनि कल्पेश कुमार चव्हाण, पोउनि सागर काळे, पोउनि महादेव गुट्टे, पोउनि प्रदीप बो-हाडे, मपोउनि आकांक्षा जाधव, पोहेकॉ/१५८२ चव्हाण, पोहेकॉ/१४३२ लांडे, पोहेकॉ/३५३ उदावंत, पोहेकॉ/४७३ संतोष वाघ, पोका/७१७ गौतम लंगड, पोका राजेंद्र बिरदवडे, पोका नामदेव नालेगावकर, पोका केवळसिंग राजपूत, पोका दिघे, पोका बाबा आहेर, पोका तुषार दवळी, पोका विजय धनधर, पोका शुभम ठोके, मपोका मनिषा पुरी, मपोका निखाडे ,रोहित सूर्यवंशी आणि सोमनाथ जाधव यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/१५८२ चव्हाण करीत आहेत.
शिर्डी पोलिसांच्या या कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील चोरीच्या घटनांवर पोलिसांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments