सालाबाद प्रमाणे यावर्षीही संत सेना महाराज नाभिक समाजाचे वतीने राहाता तालुक्यातील
सावळीविहीर बुद्रुक येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा व अखंड शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्ताने दिनांक सात व आठ सप्टेंबर 2026 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे श्री संत सेना महाराज कृपेने राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने अखंड शिवलीलामृत ग्रंथ पारायण आयोजित करण्यात आले आहे. श्री नर्मदेश्वर सेवाधाम शिवकुटीचे परमपूज्य महंत संन्याशी श्री आत्मारामगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सावळी विहीर बुद्रुक येथील श्री हनुमान मंदिराच्या सभामंडपात सोमवार दिनांक सात सप्टेंबर 2026 ला चौथ्या श्रावणी सोमवारी अखंड शिवलीलामृत ग्रंथ पारायण सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक 8 सप्टेंबर 2026 या दिवशी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येणार असून सकाळी सात वाजता श्रींना महाभिषेक व नंतर पूजन करण्यात येणार आहे सकाळी नऊ वाजता श्री संत सेना महाराज प्रतिमेची गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी बारा वाजेपर्यंत श्री महंत संन्याशी आत्मारामगिरीजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे करण्यात आला आहे. तरी भाविकांनी श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.
असे आवाहन संत सेना महाराज नाभिक समाज व समस्त भजनी मंडळ आणि पंचक्रोशीच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रका द्वारे करण्यात आले आहे.श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा व संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त ह भ प श्री विठ्ठल नारायण कातोरे पाटील यांच्याकडून 25 शिवलीलामृत ग्रंथ सप्रेम भेट देण्यात आले आहेत. या ग्रंथाचा स्वीकार श्री महंत संन्यासी आत्माराम गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शना खाली ह भ प मनोज महाराज बिडवे व ढवळे सर व ह भ प योगेश पाचोरे यांनी केला आहे.
0 Comments