कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाच्या पिलाचे युवकाने वाचविले प्राण ----

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाच्या पिलाचे युवकाने वाचविले प्राण ----

दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१९.....
आईपासून भरकटलेल्या हरणाच्या पिला वर आठ ते दहा मोकाट कुत्र्यांच्या कळपाने केला हल्ला.

सोयगाव शिवारातील गट क्रमांक १०१ मध्ये जोरदार हल्ला चढवला असता ईश्वर परदेशी या युवकाने जीवाची पर्वा न करता हरणाच्या पिला ला कुत्र्यांच्या कळपाच्या तावडीतून सोडवल्याची घटना रविवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.युवकाच्या या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
     दरम्यान दुपारच्या सुमारास आई पासून भरकटलेल्या हरणाच्या पिला वर आठ ते दहा मोकाट कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवला, जीव वाचविण्याच्या आकांताने ओरडत असलेल्या पिलाचे आवाज शेतात काम करीत असलेल्या ईश्वर परदेशी यांच्या कानी पडताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धैर्याने कुत्र्यांच्या कळपाकडे धाव घेत हरणाच्या पिलाचे प्राण वाचवले. मात्र कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा पुढील पाय मोडला होता. ईश्वर परदेशी याने हरणाची कुत्र्यांच्या कळपापासून रक्षा केली.या प्रकरणाची माहिती वनविभागाला मिळताच वनरक्षक सोयगाव एस.एम चौधरी, वनरक्षक घोसला एस एस चौधरी, कादिर पठाण वनसेवक, सुरेश जाधव वन मजूर यांनी घटनास्थळी धाव घेत हरणाच्या पिला ला तात्काळ ताब्यात घेऊन बनोटी येथील पशू वैद्यकीय दवाखान्यात हरणा वर उपचार करण्यात आले.त्यानंतर सोयगाव येथे आणण्यात आले असून हरणाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती सोयगाव वनविभागाने दिली आहे.

Post a Comment

0 Comments