लोणी बसस्थानकावर माणुसकीचा ओलावा: हरवलेला मोबाईल मिळवून दिला वाहतूक नियंत्रकांनी*



 प्रतिनिधी ( रूपाली भालेराव )
लोणी :राहाता तालुक्यातील लोणी बसस्थानक परिसरात माणुसकीचे एक आगळेवेगळे दर्शन घडले असून, एका आजोबांचा हरवलेला मोबाईल लोणी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत यांनी आपल्या सतर्कतेने व प्रामाणिकपणाने त्यांना परत मिळवून दिला आहे.
घडलेली घटना अशी की, एका प्रवाशाचा मोबाईल पंढरपूर-नाशिक बसमध्ये प्रवास करत असताना हरवला होता. या बसमधील प्रवासी बबन नामदेव रांधवणे हे कोल्हार येथे उतरले असता त्यांच्या लक्षात आले की त्यांचा मोबाईल बसमध्येच राहिला आहे. त्यांनी तत्काळ ही बाब कोल्हार येथील वाहतूक नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिली. कोल्हार येथील वाहतूक नियंत्रकांनी कोणतीही दिरंगाई न करता लोणी बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत यांच्याशी संपर्क साधून संबंधित बसचा शोध घेण्यास सांगितले. यावेळी श्री रावसाहेब पर्वत साहेब यांनीही तत्परता दाखवत पंढरपूर-नाशिक बसचा शोध घेऊन त्यामध्ये असलेला मोबाईल ताब्यात घेतला.
मोबाईल सापडल्यानंतर रावसाहेब पर्वत यांनी बबन नामदेव रांधवणे यांना बोलावून घेतले मोबाईल हा त्यांचाच आहे का याची खात्री करून घेतली त्यानंतर त्यांना तो मोबाईल देण्याचा निर्णय घेतला पत्रकार रूपाली भालेराव यांच्या उपस्थितीत तो मोबाईल संबंधित प्रवाशाला सुपूर्द केला. आपला हरवलेला मोबाईल सुरक्षित हाती परत मिळाल्यानंतर संबंधित आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच माणुसकीचा हा अनुभव सुखावून गेला.
आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या काळात माणुसकी हरवत चालली असल्याची टीका होत असताना, लोणी बसस्थानकावरील या घटनेने माणुसकीचा अंकुर आजही जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे. रावसाहेब पर्वत यांनी दाखवलेली ही तत्परता आणि प्रामाणिकपणा खरोखरच कौतुकास्पद असून, या घटनेमुळेच जणू काही पांडुरंगच भेटल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. लोणी बस स्थानक येथील वाहतूक नियंत्रक श्री रावसाहेब पर्वत साहेब यांचे काम नेहमीच प्रामाणिकपणा आणि कार्य सतर्कता दिसून येते प्रवासांचे कोणतेही प्रश्न असो कुठलेही हरवलेली गोष्ट असो पर्वत साहेबांकडे याचे उत्तर नेहमीच मिळते. त्यामुळे लांबवर प्रवास करून आलेल्यांना सुद्धा माणुसकीचा आपलेपणाचे दर्शन लोणी बस स्थानक येथे घडते. आपली हरवलेली गोष्ट येताना जो काही आनंद असतो त्या आनंदाची किंमत करता येत नाही एवढा आनंद यावेळी या आजोबांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
 सत्तेचा महासंग्राम --
 प्रतिनिधी :- रुपाली भालेराव 
 सहसंपादक :- साबळे ज्ञानेश्वर

Post a Comment

0 Comments