लोहगाव (वार्ताहर ) राहाता तालुक्यातील
बाभळेश्वर येथील श्री. संत एकनाथ महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बाभळेश्वर या संस्थेच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त विद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.
त्या करिता मा. चेअरमन साहेब ,संचालक मंडळ, सभासद ,व सेवक वर्ग यांच्यावतीने ३१ हजार रुपयाची भरीव देणगी धनादेश द्वारे देण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक तथा माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. . रावसाहेब पाटील म्हस्के (भाऊ), रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण पाटील कडू, पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव म्हस्के , व्हा .चेअरमन रामदास बेंद्रे संचालक अण्णासाहेब म्हस्के,संजय इनामके ,साहेबराव शिंदे ,विद्यालयाचे प्राचार्य . विनायक मेथवडे सर, व राजेंद्र म्हस्के , शिवाजी बेंद्रे , आदी संचालक मंडळ तसेच पतसंस्था सेवक वर्ग व महात्मा गांधी विद्यालयाचे 1983 बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments