गडकरी राजकुमार
शिर्डी( प्रतिनिधी )-राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026रोजी सायंकाळी सहा वाजता लोकप्रिय असा सुप्रसिद्ध युवा रॉकस्टार राहुल साठे यांचा बहारदार भीम गीतांचा कार्यक्रम सोमैय्या विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी सावळी विहीर बुद्रुक येथे आयोजित करण्यात आला आहे. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सावळीविहीर बुद्रुक व समस्त ग्रामस्थ सावळी विहीर बुद्रुक यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्या सुप्रसिद्ध युवा रॉकस्टार राहुल साठे यांचा बहारदार लोकप्रिय भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व महाराष्ट्राचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजयदादा विखे पा.यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच ओमेश जपे, शिर्डीच्या नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात, श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, शिर्डीचे उपनगराध्यक्ष अभयराजे शेळके, शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती ,सावळीविहीर बुद्रुकचे उपसरपंच विकास जपे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात ,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी शिर्डीचे नगरसेवक नितीनराव कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष संदीप सोनवणे, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, उपनिरीक्षक निवांत जाधव ,पोलीस हवालदार नितीन शेलार, शिर्डीचे नगरसेवक दत्तात्रेय (छोटेबापू)कोते आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख मान्यवर बाळासाहेब जनार्धन जपे ,अशोकराव आगलावे, सोपान पवार, अशोकराव जमधडे ,नाना त्रिभुवन ,सौ.रूपाली आगलावे, जिजाबा आगलावे, शांताराम जपे,पोलीस पाटील संगीता वाघमारे, जयराज दंडवते ,अजय जगताप, संजय मातेरे ,दिलीप बाठीया. महेश जमधडे, संदीप वाबळे ,चंद्रकांत काळे ,कैलास कातोरे, प्रसाद मते ,सतीश डेंगळे ,विजय गायकवाड, राजेंद्र जपे ,देवेंद्र भवर सचिन गायकवाड ,भाऊसाहेब जगताप, सुरेश ठाकूर ,प्रसाद पाटील, प्रशांत कोठारी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य जी.बी बॉईज ग्रुप सोमैय्या नगर, तसेच सावळी विहीर बुद्रुक येथील सिद्धार्थ तरुण मंडळ, एकता तरुण मंडळ, अमरदीप युवक संघटना, अजिंक्य तरुण मंडळ, शौर्य प्रतिष्ठान ,परशुराम तरुण मंडळ, शिवबा प्रतिष्ठान ,भीम संघर्ष मित्र मंडळ, साई सेवक मित्र मंडळ ,भवानी मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, एकलव्य मित्र मंडळ आदींचे सहकार्य लाभणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा व सुप्रसिद्ध युवा रॉकस्टार राहुल साठे यांचा लोकप्रिय ,बहारदार भीम गीतांचा कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा .असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सावळीविहीर बुद्रुक व समस्त ग्रामस्थ सावळीविहीर बुद्रुक यांच्या वतीने एका पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
0 Comments