अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी (प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे)
अहिल्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सडे येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. कुसुमबाई निवृत्ती साळवे ( वय71) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले
कुसुम बाई साळवे या सडे गावच्या परिसरात सर्वांना लोकप्रिय व मनमिळाऊ असा त्यांचा स्वभाव होता. कुसुमबाई साळवे या धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे परिसरात त्यांना मानसन्मान मिळत होता.
त्यांच्या या आकस्मित निधनामुळे सडे परिसरात हळूहळू व्यक्त करण्यात येत असून समाजातील एक धार्मिक व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा. दोन मुली. जावई. नातवंडे असा मोठा परिवार आहे. राहुरी कृषी विद्यापीठातील कर्मचारी बाळासाहेब साळवे यांच्या त्या मातोश्री आणि प्रवीण बाळासाहेब देठे यांच्या त्या आजी होत.
0 Comments