शिर्डी (प्रतिनिधी)-श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्यामार्फत जाहीर करण्यात येते की, सोमवार दि. ०३ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाच्या अनुषंगाने श्री साईबाबा समाधी मंदिर तसेच संस्थान अंतर्गत सर्व मंदिरांमध्ये दुपारी ०३.२० वा. ते सायंकाळी ०६.४८ वा. या कालावधीत दर्शन व्यवस्था बंद राहील.
सदर कालावधीत मंदिरामध्ये धार्मिक मंत्रोच्चार विधी सुरू राहतील.
सायंकाळी ०७.०० वा. मंगलस्नान, “शिर्डी माझे पंढरपूर” आरती व धुपारती संपन्न झाल्यानंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू होऊन रात्री १०.०० वा. नियमित शेजारती होईल.
0 Comments