त्यांनी बोलताना पुढे सांगितले की, संत तुकाराम महाराज म्हणतात,कि,राम कृष्ण हरी” या नामातच सर्व वेदांचे सार आहे.तर संत ज्ञानेश्वर महाराजांनीही नाममहिमा स्पष्ट करताना सांगितले की, नाम घेतल्याने अंतःकरण शुद्ध होते. आणि आत्मज्ञानाची दारे उघडतात.नाम म्हणजे केवळ शब्द नाही; नाम म्हणजे चैतन्य होय.नाम म्हणजे भगवंताचा स्पर्श.नाम म्हणजे अंतःकरणातील अज्ञानाचा अंधार दूर करणारा प्रकाश होय. असे सांगत ते पुढे म्हणाले की,
कमीत कमी वेळात, सोप्या पद्धतीने नामस्मरण करण्यासाठी श्वासाशी नाम जोडा , श्वास घेताना “राम”, सोडताना “कृष्ण” किंवा “ॐ नमः शिवाय” मनात म्हणा.
दररोज नियमित सकाळी उठल्यावर १० मिनिटे आणि रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे नामस्मरण करा,मनापासून व मोठ्याने न म्हणता अंतर्मनात जप करा.चालताना, काम करताना, रिकाम्या वेळेचा उपयोग नामासाठी करा.
नामस्मरणासाठी विशेष वस्त्र, विशेष स्थान, विशेष आसन आवश्यक नाही. नामाला कोणतीही अट नाही. ते सर्वांना, सर्वत्र, सर्वकाळ उपलब्ध आहे.
अध्यात्माचा खरा हेतू
आज अनेकदा अध्यात्म बाह्य स्वरूपात दिसते . मोठे आश्रम, अनुयायांची संख्या, प्रसिद्धी, आयोजन. परंतु हे सर्व साधन आहेत; साध्य नाहीत.
जर एखाद्याने हजारो शिष्य जोडले, परंतु स्वतःच्या अंतःकरणात भगवंताचा वास निर्माण केला नाही, तर त्या बाह्य यशाचा काय उपयोग? असे संगत
अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखणे.स्वतःला ओळखणे म्हणजे आत्म्याला ओळखणे.
आत्म्याला ओळखणे म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणे. भगवंताचे होणे होय.
भगवंताचे होणे म्हणजे संसार सोडणे नव्हे; तर अहंकार सोडणे होय.भगवंताचे होणे म्हणजे स्वतःची इच्छा त्याच्या इच्छेत विलीन करणे होय.
भगवंताचे होणे म्हणजे प्रत्येक क्षणी नामाशी जोडलेले राहणे होय.जेव्हा नाम सतत अंतःकरणात गुंजते, तेव्हा मन शुद्ध होते. मन शुद्ध झाले की बुद्धी प्रसन्न होते. बुद्धी प्रसन्न झाली की विवेक जागृत होतो. आणि विवेक जागृत झाला की आत्मसाक्षात्काराची वाट सुकर होते.तेंव्हा आश्रम उभारण्यापेक्षा अंतःकरणात भगवंताचे मंदिर उभारा.
शिष्य वाढवण्यापेक्षा स्वतःच्या सद्गुणांची वाढ करा.पूजा स्वीकारण्यापेक्षा भगवंताचे नाम स्वीकारा.नामस्मरण हीच खरी दीक्षा आहे.नामस्मरण हीच खरी साधना आहे.नामस्मरण हीच खरी परमेश्वरप्राप्तीची वाट आहे.तेंव्हा आपण सर्व
दररोज राम कृष्ण हरी, ओम नमः शिवाय, हर हर महादेव आदी नाम घेऊ, मनात नामस्मरण करू, गुरुने दिलेले नाम जपू, शुद्ध मनाने कायम देवाचा ध्यास धरू,अंतःकरण शुद्ध करू आणि भगवंताचे होण्याचा प्रयत्न करू, असे म्हणतात आत्माराम गिरीजी महाराज यांनी शेवटी म्हटले आहे.
0 Comments