युवा नेते सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळीभान जिल्हा परिषद शाळेना प्रत्येक एक इंटरॅंक्टिव्ह टच स्क्रीन इ बोर्ड संच भेट

टाकळीभान, ( वार्ताहर ) युवा नेते माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त टाकळीभान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीवाडी, जिल्हा परिषद शाळा दाभाडे वस्ती, जिल्हा परिषद शाळा बनकर वस्ती यांना प्रत्येकी एक इंटरँक्टिव्ह टंच स्क्रीन ई बोर्ड संच देण्यात आला आहे. 


          नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दोन खोल्या बांधकामासाठी २२ लक्ष रुपये, टाकळीभान येथील गावांतर्गत रस्त्यावर स्ट्रीट लाईट साठी ९ लक्ष रुपये, गावठाण भागात पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी ९ लक्ष रुपये तसेच अमरधाम येथे पत्रा शेड साठी १० लक्ष रुपये, टाकळीभान जुना खिर्डी रस्ता खडीकरणा साठी २० लक्ष रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी सभापती नानासाहेब पवार व उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी दिली आहे.
     टाकळीभान येथील घरकुल योजनेसाठी गावातील काही गट हे गावठाणाकडे वर्ग व्हावे यासाठी तसेच टाकळीभान येथील शेती शाळा मध्ये ४०० मीटर ट्रॅक व सदर ट्रॅक मध्ये विविध खेळाचे ग्राउंड व कबड्डी संघासाठी मॅट तसेच अहिल्यानगर वस्ती गृहासाठी समाज कल्याण विभागामार्फत इमारत दुरुस्ती कामाचे प्रस्ताव नामदार.राधाकृष्ण विखे पाटील यांना देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती माजी सभापती नानासाहेब पवार व उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments