दिलीप शिंदे
सोयगाव दि.२२- जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे दि.२२ सोमवारी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दशसूत्री उपक्रम अंतर्गत शाळा स्तरावरील उपक्रमाचा आढावा घेण्यात आला व पुढील शाळा गुणवत्ता विकासाचे नियोजनावर चर्चा करण्यात आली.
दरम्यान पालक सभेतून शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनील ठोंबरे , उपाध्यक्षपदी भारती भागवत गायकवाड यांची निवड करण्यात आली. सचिव शाळेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड तर ललित पंडित,रुपाली समाधान पाटील,उज्वला शांताराम ढगे,वाल्मीक चव्हाण, भिला राठोड,अनिल शिंदे,अनिता पोपट कोळी, स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी कृष्णा जुनघरे,शिक्षक प्रतिनिधी भास्कर चौधरी,स्थानिक प्राधिकरण सदस्य नगरसेवक नगरपंचायत,विद्यार्थी प्रतिनिधी भावेश अंबादास जाधव,चंचल नंदू राठोड यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षांसह नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रामेश्वर शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर चौधरी यांनी तर आभार राजेंद्र उंबरकर यांनी मानले.
0 Comments