या दिंडीचे मार्गदर्शक व प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप भऊरकर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा यावेळी प्रवचनाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता जगताप पाटील वस्ती ,चारी नंबर पाच, भऊर तालुका वैजापूर येथे होणार आहे. प्रवचन झाल्यानंतर उपस्थित भाविकांसाठी अन्नदाते बाळासाहेब चांगदेव जगताप, गजानन बाळासाहेब जगताप,, बापू बाळासाहेब जगताप, यांच्या वतीने महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षाप्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र आळंदी असा पायी दिंडी सोहळा ह भ प संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जात असतो .यावर्षेही या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा दिंडी सोहळा दरमजल करत श्रीक्षेत्र भऊर येथून श्री आळंदीला एकादशीला पोहोचल्यानंतर तेथे दर्शन करून व दुसऱ्या दिवशी काल्याचे किर्तन करून हा दिंडी पायी सोहळा परत श्रीक्षेत्र भऊर येथे आल्यानंतर येथे विधिवत पूजन करण्यात येत असते. आता या दिंडीचे विना पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रवचन कार्यक्रम होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे व अधिकृत रित्या या दिंडी सोहळ्याची सांगता होणार आहे. असे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
0 Comments