दिलीप शिंदे
सोयगाव दि.१९ -- सोयगाव तहसिल कार्यालयाच्या समोर असलेल्या प्यासा बिअर बार चे दि.१९ बुधवारी रात्री अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले त्यानंतर दरवाज्याचे कुलूप तोडून चोरी केल्याची घटना सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
सुदैवाने बारमध्ये दैनदिन व्यवहाराचे पैसे नसल्याने चिल्लर असलेले बाराशे ते पंधराशे रुपयांवर चोरांनी डल्ला मारल्याची चर्चा शहरात सुरू होती. बार मध्ये असलेल्या मद्याच्या बाटल्या मात्र सुरक्षित होत्या. दरम्यान प्यासा बिअर बार चे कुलूप तोडून चोरी झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्याने पोलिसांनी तात्काळ प्यासा बिअर बार गाठले.घटनेची माहिती घेत सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले.अद्याप पर्यंत सोयगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.काही महिन्यापूर्वी शेंदुर्णी सोयगाव रस्त्यालगत असलेले बिअर बार व शहरातील दुकाने चोरट्यांनी फोडले होते. सोयगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे जुगार खेळणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरासह आजूबाजूला सर्रास जुगाराचे अड्डे सुरू असून सोयगाव पोलिस सुक्ष्म दुर्लक्ष करीत असून ग्रामीण गुन्हे शाखा सोयगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यावर छापा टाकून कारवाई करीत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान प्यासा बिअर बार मधून बाराशे ते पंधराशे रुपयांची चिल्लर चोरट्यांनी चोरली असल्याची चर्चा शहरात सुरू होती.बार मध्ये असलेल्या मद्याच्या बाटल्या मात्र सुरक्षित होत्या. सुदैवाने दैनदिन व्यवहाराचे पैसे बार मध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.अद्याप उशिरा पर्यंत सोयगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.
0 Comments