श्रीक्षेत्र सावळीविहीर ते श्रीक्षेत्र सप्तशृंगीगड पदयात्रेचे 21 ते 25 या कालावधीत जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन!

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)

सावळीविहीर ( प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथील जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीक्षेत्र सावळीविहीर ते श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सावळीविहीर बुद्रुक येथील जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने सप्तशृंगी गड पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. 

यावर्षीही शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत या श्रीक्षेत्र सावळी विहीर ते श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड अशा पायी  पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा येथील श्री हनुमान मंदिर प्रांगणात शुक्रवारी सकाळी आठ वाजता श्री सप्तशृंगी मातेच्या रथाचे मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व पूजन करून श्री सप्तशृंगी गडाकडे प्रस्थान करणार आहे. या पदयात्रेचा पहिला मुक्काम चासनळी, दुसरा मुक्काम ऊगाव ,तिसरा मुक्काम बहादुरी व चौथा मुक्काम श्री सप्तशृंगी गडावर होणार असून मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी श्री सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन पदयात्री परत गावी परतणार आहेत . अशी माहिती जगदंबा प्रतिष्ठांचे सागर जपे, ऋषी जपे, सौरभ पळसे, दीपक पवार, अक्षय चव्हाण, रामा थोरात, विशाल लकारे आदींनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

0 Comments