भटक्या मुक्त समाजाला शेड्युल टाईपच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू



नंदकुमार बगाडे अहिल्यानगर 

सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा

मुंबईतील आझाद मैदान येथे भटक्या मुक्त समाजाला शेड्युल टाईपच्या सवलती मिळाव्यात, या प्रमुख मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. समाजाच्या हक्कासाठी लढा उभारला जात असून या उपोषणाला समाजातील तसेच राजकीय-सामाजिक नेत्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

या प्रसंगी भारतीय लोकसभेचे राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण, वडार समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक श्रीरामपूर नगरपालिका दीपक अण्णा कुऱ्हाडे, भटक्या समाजाचे अध्यक्ष माजी आमदार लक्ष्मण माने साहेब, ठाणे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था संघाचे अध्यक्ष वसंत फुलवर, तसेच श्रीरामपूर नगरपालिका माजी नगरसेवक मल्लू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपोषणकर्त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, भटक्या मुक्त समाजाला शेड्युल टाईपच्या सवलती तत्काळ लागू कराव्यात, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

 समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेला हा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments