कमलपूर जि,पा, शाळेमध्ये बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ व नवीन आलेल्या शिक्षकांचा स्वागत



टाकळीभान प्रतिनिधी-कमालपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमालपुर येथे बदली झालेल्या शिक्षकांसाठी निरोप समारंभ तसेच नवीन आलेले शिक्षकांसाठी स्वागत समारंभाचे एकत्रित आयोजन करण्यात आले होते 
     यावेळी कमालपूर जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करत असलेल्या श्रीमती सारिका पवार तसेच  महेंद्र विलास धामणे यांची बदली झाली . त्यांना निरोप देत असताना सर्व ग्रामस्थांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली माजी सरपंच  सचिन भाऊ मुरकुटे यांनी पवार मॅडम आणि धामणे सर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करून शाळेची पटसंख्या वाढवली तसेच शाळेचे गुणवत्ता विकासामध्ये अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले असे मनोगत व्यक्त केले,
      तसेच शाळेच्या नवीन होणारे इमारतीबाबत माहिती दिली तर श्रीमती पवार मॅडम यांनी शाळा सोडून जाताना  अतिशय भावनिक होत असून विद्यार्थ्यांचे कौतुक केले , तसेच शाळेमध्ये काम करत असताना आलेले अनुभव ग्रामस्थ समोर विशद केले, तसेच काम करत असताना झालेल्या सहकार्याबद्दल कमालपूरचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष  भास्कर मुरकुटे तसेच विद्यमान सरपंच  स्वातीताई सचिनराव मुरकुटे यांचे देखील आभार व्यक्त केले बदलून आलेले शिक्षक  संजय नाईक राव शिंदे यांनी देखील शाळेच्या विकासासाठी सतत कार्य तत्पर राहण्याची ग्वाही  याप्रसंगी सर्व कमालपूरच्या ग्रामस्थांना दिली.
     यावेळी जिल्हा परिषद शाळेतील दीपक पवार पवार सर, युवा प्रशिक्षणार्थी  सुतार सर, तसेच काशिनाथ पाटील मुरकुटे विद्यालयाचे मुख्याध्यापक  कुंभार सर,  शिंदे सर,  बावचे सर, तसेच इतर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते कमलपूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दीपक मोगले, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ तसेच युवकांनी यावेळी पवार मॅडम तसेच धामणे सर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. 
     याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण गोरे, ग्रामपंचायत सदस्य किरण गोरे, बबन गोरे, वैभव भोरे, रामनाथ दवंगे, बंडू मुंजाळ, रफिक पठाण, काकासाहेब दवंगे, किशोर वर्पे, नवनाथ मुरकुटे, विलास मुंजाळ, दादासाहेब मुंजाळ, ज्ञानेश्वर गोर्डे, सागर मुंजाळ, दीपक बर्डे, अतूल अंभोरे, भाऊसाहेब गोरडे, दत्तात्रय गोरे, अशोक गोरे , इत्यादी मान्यवर तसेच अनेक महिला ग्रामस्थ, कर्मचारी देखील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments