डॉ. दुधाट यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर



लोहगाव (वार्ताहर): विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, श्रीरामपूर यांच्यावतीने स्व. डॉ. वा. ग. तथा बाबासाहेब कल्याणकर यांच्या जयंतीनिमित्त, स्व. नामदेवराव विश्वनाथ सुकळे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त व ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक डॉ. शरद भाऊसाहेब दुधाट यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती संस्थापक सचिव सुखदेव सुकळे यांनी दिली.  
श्रीरामपूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. कुमार चौथानी, माळेवाडी येथील शेतकरी संघटनेचे नेते सुदामराव औताडे व सामाजिक कार्यकर्ते निलेश भालेराव यांनाही राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्काराचे वितरण विश्वलक्ष्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव अनारसे यांच्या हस्ते व माजी प्राचार्य टी.ई. शेळके, डॉ. प्रकाश मेहेकरकर, सुखदेव सुकळे, डॉ. बाबुराव उपाध्ये, सुयोग बुरकुले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता श्रीरामपूर येथील आगाशे हॉलमध्ये होणार आहे. डॉ. दुधाट हे मराठी विषयाचे अध्यापन करीत असून त्यांची संशोधनपर लेख व प्रासंगिक लेखन प्रसिद्ध झालेले आहेत. सध्या ते जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे सचिव, राहाता तालुका कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे संघटक, अहिल्यानगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय संघटनेचे जिल्हाध्यक्ष, आनंदवन परिवाराचे स्नेही, कार्यकर्ते व शिक्षक प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. 
त्यांच्या या यशाबद्दल रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, डॉ राजीव शिंदे, डॉ. विकास आमटे, एकनाथराव घोगरे, माजी प्राचार्य भीमराव आंधळे, प्राचार्य विनायक मेथवडे, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, डॉ. बाबुराव उपाध्ये, युवा नेते व चेअरमन सुधीरदादा म्हस्के, माजी प्राचार्य मधुकर अनाप, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे,  अध्यक्ष सुनील डिसले, अध्यक्ष सोपान कदम, अध्यक्ष प्रमोददादा मोरे, कोंडीराम नेहे, बाबासाहेब अंत्रे, संजय ठाकरे, नरेंद्र ठाकरे, विलास गभाले आदीसह शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments