दिलीप शिंदे
सोयगाव, दि. २३ - ज्योत घेऊन येणाऱ्या भक्तांचे सोयगाव येथील सुप्रसिद्ध माऊली गुळाचा चहा सेंटरचे मालक दिलीप सुरडकर व क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था यांनी सालाबादप्रमाणे स्वागत करून त्यांना चहा व केळीचा अल्पोहार देण्यात आला. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे सुरडकर यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव बसस्थानकाजवळील सुरडकर यांचे गुळाच्या चहाचे सेंटर आहे. सप्तश्रृंगी गड, पाटणादेवी, जोगेश्वरी माता, तुळजापूर, माहूर गड, महालक्ष्मी माता कोल्हापूर आदी सुप्रसिद्ध देवी स्थळांहून अनेक दुर्गोत्सव मंडळ ज्योत घेऊन सोयगाव येथून जात असतात.
यावेळी या भक्तांची उदात्त हेतूने सेवा करण्याचा संकल्प दिलीप सुरडकर व क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा यांनी सात वर्षांपूर्वी केला होता.याच उद्देशाने सोयगाव मार्गे ज्योत घेऊन जाणाऱ्या भक्तांना केळी व चहाचे वाटप केले जाते. या सेवे बद्दल सामाजिक कार्यकर्ते अमोल निकम, दत्तू रोकडे, आरोग्यदुत डिगांबर वाघ,कृषीभूषण अरुण सोहनी, शमा तडवी,राम फुसे,महेश मानकर,शाम पाटील, भगवान कोथलकर, हरीश पाटील,राम सोहनी, पंकज परदेशी,तुकाराम सोनवणे,अनिल चौधरी,राहुल सोनवणे,प्रकाश देसाई,अनिल लोखंडे,अशोक ढगे आदींकडून कौतुक केले जात आहे.
0 Comments