दिलीप शिंदे
सोयगाव दि.१५ - सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारात अजगराला ठार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बहुलखेडा येथील दोघं आरोपी दि.१५ सोमवारी स्वतः सोयगाव वनविभाग कार्यालयात हजर झाले.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक करून सोयगाव येथील मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय सोयगाव येथे हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना ०३ दिवसांची वन कोठडी सुनावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारात शेळी गिळंकृत केलेल्या अजगराची ठेचून हत्या करून त्याच्या पोटातून मृत शेळी बाहेर काढल्या चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता याप्रकरणी सोयगाव वनविभागाने अफरोज नजीर पठाण वय २१ वर्षे, हमजेखा मुसा तडवी वय ३१ वर्षे रा. बहुलखेडा ता. सोयगाव या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. दि.१५ सोमवारी दोन्ही आरोपी स्वतः सोयगाव वन विभागाच्या कार्यालयात हजर झाले.वन अधिकाऱ्यांनी त्यांना अटक करून सोयगाव येथील मा. न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय सोयगाव येथे हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना ०३ दिवसांची वन कोठडी सुनावली. छत्रपती संभाजीनगर उपवनसंरक्षक सुवर्णा माने,सहाय्यक वनसंरक्षक सिल्लोड एस.आर.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ, सोयगाव वनपाल पी. डी.कोळी, बनोटी वनपाल एम. एम. अली,अंभई वनपाल एस. एन. नागरे, वनरक्षक शरद चेके,तडवी, सणांसे, धोतरे, सपकाळ,काकडे,काळे व वनकर्मचारी यांनी फरार आरोपींचा शोध घेतला.गुन्ह्याचा पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ हे करीत आहेत.
0 Comments