दिलीप शिंदे
सोयगाव, दि.१५;-तालुक्यातील जरंडी आणि बनोटी या दोन मंडळात सोमवारी सकाळी सात वाजेपासून ते साडे आठ वाजेपर्यंत दीड तास ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा पाऊस झाला या ढगफुटी सदृश पावसाने घोसला, नांदगाव, नांदगाव तांडा,तिडका,जंगली कोठे,बोरमाळ तांडा,या पाच गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसाने तासभर थैमान घातले यासह बनोटी, गोंदेगाव मंडळातील ४३ गावांमध्ये अतिवृष्टी मुळे नुकसान झाले आहे दरम्यान घोसला येथील खटकाळ नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरून घोसला, नांदगाव, शिवारातील शेती खरडून वाहून गेली असून काही शेतकऱ्यांचे कपाशीच्या पिके पुरात वाहून गेले तिडका बोरमाळ, जंगली कोठे शिवरतही कपाशी, मका,तूर,सोयाबीन, केळी ही पिके आडवी पडली आहे दरम्यान खटकाळी नदीला पूर आल्या मुळे सोयगाव-चाळीसगाव वाहतूक ठप्प होती.
बनोटी मंडळातील ४३ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे कपाशीचे पिके आडवी झाली आहेत,काही भागात शेतात गुडघा भर पाणी साचले आहे बनोटी,गोंदेगाव, हनुमंत खेडा या ठिकाणी कपाशी, मक्याच्या पिकांचे आडवी होऊन नुकसान झाले आहे दरम्यान ढगफुटी भागात महसूल आणि कृषी विभागाने तातडीने नुकसानी चे पंचनामे हाती घेतले होते
चौकट;- ढगफुटी झालेल्या गावांना नुकसानी ची पाहणी करण्यासाठी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील,जळगाव जिल्हा भाजपचे मधुकर पाटील यांच्यासह पाचोरा कृषी आणि महसूल विभागाने घोसला, तिडका या ढगफुटी सदृश पावसाने झालेल्या नुकसानी ची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला होता..
बनोटी शिवारातील कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे गुडघ्यावर पाण्यात बनोटी, गोंदेगाव शिवारातील पिके पाण्यात बुडाली असून या मंडळात ४३ गावांना अतिवृष्टी चा फटका बसला आहे.
चौकट:-- सन २०२३ ते २०२५ या कालावधीत नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षात नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना गैरहजर राहत असल्याच्या कारणावरून सन २०२३ व २०२४ मध्ये कारणे दाखवा नोटिस बजावून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ म.ना.से. शिस्त व अपील नियम १९७९ चे तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळेच तहसीलदार यांच्या आदेशाला कर्मचारी जुमानत नाही. तहसिल कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कागदावरच आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुर्लक्षित असलेल्या सोयगाव तालुक्याकडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
0 Comments