दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.२४- सोयगाव तालुक्यातील वाडी सुतांडा येथील शेतकरी अविनाश कैलास जंजाळ यांना दि.२२ सोमवारी सायंकाळी शेतामध्ये दुर्मिळ जातीचा १० फूट लांबी असलेला अजगर दिसला.त्यांनी तात्काळ भ्रमणध्वनीद्वारे सलमान पठाण या सर्पमित्राला माहिती दिली.
सर्पमित्र सलमान पठाण व सर्पमित्र सहकारी यांनी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास अजगराचा रेस्क्यू करून त्याच्यावर उपचार करून दि.२३ मंगळवारी सायंकाळी अधिवासात सुखरूप मुक्तता केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील वाडी सुतांडा येथील शेतकरी अविनाश कैलास जंजाळ यांच्या वाडी सुतांडा शिवारातील गट क्रमांक १५६ मधील शेतामध्ये दि.२२ सोमवारी सायंकाळी १० फूट लांबी असलेला दुर्मिळ अजगर आढळला.त्यांनी वाडी येथील सर्पमित्र सलमान पठाण यांना भ्रमणध्वनीद्वारे अजगर संबंधी माहिती दिली. सर्पमित्र् संदीप चव्हाण,रवींद्र राठोड,सलमान पठाण,मोहन चौधरी, रतिलाल जाधव ,ज्ञानेश्वर जाधव, सुनिल चव्हाण,समाधान राठोड , तेजस लोहार यांनी १० फूट लांबी असलेल्या दुर्मिळ अजगराचा सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सुरक्षित रित्या रेस्क्यू करून त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याची मंगळवारी सायंकाळी अधिवासात सुखरूप मुक्तता केली.
--------- --------- -------- ------- ------------------ --------- --------
प्रतिक्रिया -- वन्यजीव व जखमी अवस्थेत आढळलेल्या वन्यप्राण्यांची वन्यप्रेमींकडून माहिती मिळताच त्यांना रेस्क्यू करून,त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना अधिवासात मुक्त केले जाते. सर्प हे शेतकऱ्याचा शत्रू नसून मित्र आहे त्यामुळे त्यांची हत्या करू नये.
सलमान पठाण
सर्पमित्र वाडी सुतोंडा
0 Comments