ब्रह्मलीन नारायणगिरी आश्रम सुरेगाव यांच्या वतीने महंत उद्धव महाराज यांनी नाम फाउंडेशनला १ लाखांची मदत सुपूर्द .

विजय बोडखे.               राजुरी (वार्ताहर): अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.पीक नष्ट झाले आहे तर अनेकांचे संसारही पुरात वाहून गेले आहेत.अशा कठीण काळात समाजातील संवेदनशील व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा असे आवाहन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.वरद विनायक सेवाधाम लोणी आणि ब्रह्मलीन नारायणगिरी आश्रम सुरेगाव यांच्या वतीने महंत उद्धव महाराज यांनी नाम फाउंडेशनला १ लाखांची मदत मंगळवारी सुपूर्द केली.
       नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी संग्राम खलाटे, विशाल नगरे, सचिन गवळी यांनी धनादेश स्वीकारला.यावेळी बोलताना उद्धव महाराज म्हणाले की,राज्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अतिवृष्टी,पूर,ढगफुटी यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेती पीक नष्ट झाले असून अनेकांचे संसार पुरात वाहून गेले आहे.पशुधनाची मोठी हानी झाली आहे.डोळ्यांनी बघवत नाही अशी भीषण परिस्थिती आहे.लोक हाल-अपेष्टा सहनकरीतआहेत.सरकार,स्वयंसेवी संस्था,सामाजिक संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.संकट मोठे असून अनेकांचे हात मदतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.समाजातील संवेदनशील नागरिक आणि विविध संस्थानी यासाठी पुढे यायला हवे.
      संत तुकाराम महाराज यांच्या उक्तीप्रमाणे ' एक एका साह्य करू' म्हणत संकटावर मात करावी लागेल.नाम फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने नेहमीच संकटात लोकांना आधार दिला आहे.त्यांनी अनेक आदर्श उपक्रम सुरू केले आहेत. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्याचे काम नामचे स्वयंसेवक करीत आहेत त्यांच्या कार्यात  सहभागी होण्यासाठी ही १ लाखांची देणगी देत आहोत.वारकरी संप्रदायाची हीच शिकवण असून त्याच मार्गाने जात आहोत.यावेळी हभप कचरू निर्मळ,प्राचार्य अर्जुन आहेर,व्यावसायिक विलास थोरात,सचिन निर्मळ आदी उपस्थित होते.                                        

Post a Comment

0 Comments