दिलीप शिंदे
सोयगाव दि.१५--काही दिवसापूर्वी भारतीय सैन्याने पाकिस्तान विरुद्ध यशस्वीपणे ऑपरेशन सिंदूर राबविले. शहीदांच्या स्मृतीसाठी व सैन्याच्या कार्यास वंदन म्हणून एक पेड भारत माँ के नाम या उपक्रमाद्वारे दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी छत्रपती संभाजी नगर येथील उपमुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात मुख्य वन संरक्षक प्रमोद लाकरा, उपमुख्य संरक्षक सुवर्णा माने, सहाय्यक वन संनरक्षक आशा चव्हाण,मानद ,वन परीक्षेत्र अधिकारी शेषराव तांबे, सागर कुटे, ए ओ. लवंगे, ओ एस. टिपाले आदींच्या हस्ते दुर्मिळ व जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सिंदूर वृक्षाचे रोपण करण्यात आले.
सर्व प्रथम २२ मे या जागतीक जैवविविधता दिनानिमित्त डॉ. संतोष पाटील यांनी केळगाव येथील शहीद स्मारका समोर या सिंदूर चे रोपण केले होते. त्या नंतर ५ जून या पर्यावरण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी या वृक्षाचे रोपन केले होते. सदर रोपं निर्मिती सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी केली असून ते रोपं त्यांनी वनविभागास भेट दिले.खेळणा नदी काठी या वृक्षाची ३ झाडे असून त्या पासुन रोपं निर्मिती करण्यात आली आहे. सिंदूर या वृक्षापासुन पूर्वी सौभाग्य प्रतीक असलेले सिंदूर अर्थात कुंकू बनवून ते वापरत असत.या वृक्षावर मॅन फेस बग" नामक कीटक उन्हाळ्यात अधिवास करतो.
0 Comments