दिलीप शिंदे
सोयगाव दि.१३ - सोयगाव येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१३ बुधवारी गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याचे उद्घाटन सोयगाव केंद्राचे केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान सायंकाळी चार वाजता परिक्षकांनी निकाल घोषित केला. यामध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक - कु. गायत्री विनोद कुमार जैस्वाल (मा.पा.विद्यालय , फर्दापुर),द्वितीय क्रमांक - कु. सिद्धी विनोद नेरपगार (श्री. एस. बी.प्रशाला, गोंदेगाव) ,तृतीय क्रमांक- कु. प्रतिक्षा विजय पगारे (कै.बाबुरावजी काळे मराठी स्कूल, सोयगाव) जाहीर करण्यात आला यावेळी गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे,केंद्र प्रमुख सचिन पाटील,विषय साधन व्यक्ती परमेश्वर कठोरे,.दौलतसिंग परदेशी, आदींची उपस्थिती होती यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे सचिन शिंदे, सचिन पाटील, फिरोज तडवी, केंद्र प्रमुख, सोयगाव ,परिक्षक विलास वालदे, जि.प.कें.प्रा. शा.जरंडी,.दौलतसिंग परदेशी,प्रशाला सोयगाव,यशवंत चौधरी ,कै.वं.ना.विद्यालय निंबायती, यांनी अभिनंदन केले.विज्ञान मेळावा यशस्वीतेसाठी विषय साधन व्यक्ती परमेश्वर कठोरे ,विज्ञान शिक्षक रामचंद्र महाकाळ, जि.प.कें. प्रा. शा.सोयगाव व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद , कें.प्रा.शा.सोयगाव यांनी पुढाकार घेतला.
0 Comments