दिलीप शिंदे
सोयगाव दि.११ - केंद्रीय राज्यमंत्री मा.खा.रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव येथील छत्रपती संभाजीनगर भाजपा जिल्हा चिटणीस पदी सुनील गावंडे व संजीवन सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
तर सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मंगेश सोहनी यांची सोयगाव भाजपा शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर उत्तर ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी निवड केली आहे. नवनिर्वाचित जिल्हा चिटणीस सुनील गावंडे,संजीवन सोनवणे व सोयगाव शहराध्यक्ष मंगेश सोहनी यांच्या निवडी बद्दल जिल्हा परिषद माजी सदस्य पुष्पा काळे,भाजपा प्रदेश सचिव सुरेश बनकर पाटील,अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी,माजी नगराध्यक्ष कैलास काळे,भाजपाचे नेते वसंत बनकर,भाजपाचे सोयगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, उपतालुका अध्यक्ष योगेश पाटील,नगरसेवक राजेंद्र जावळे, मयुर मनगटे,दिलीप चौधरी,सुनील ठोंबरे, संजय मोरे,भाजपच्या महिला तालुका अध्यक्ष नंदाबाई आगे,संजय चौधरी, कृषीभूषण अरुण सोहनी,सामाजिक कार्यकर्ते दत्तू रोकडे,आरोग्यदुत डिगांबर वाघ आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments