व्हाट्सअप,फेसबुकमुळे वाढत चाललेले मनोविकार थांबविण्यासाठी अध्यात्म संस्कृतीची गरज - महंत रामगिरी महाराज

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-  पंचवीस वर्षांपूर्वी थोरा मोठ्यांचे व संताचे चरित्र  पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमात होते आज ते नाहीत.त्यामुळे आजची पिढी बिघडत चालली असुन यास शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे. व्हाट्सअप,फेसबुक , मुळे मनोविकार वाढत आहे.यास जबाबदार कोण ? याकरिता अध्यात्म संस्कृतीची गरज असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

            शनिदेवगांव  सप्तक्रोशी येथे सुरू असलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील सहाव्या दिवशीच्या भगवदगीतेच्या ११वे अध्यायातील ५४ व्या श्लोकावर अनन्य भक्ती यावर महंत रामगिरी महाराज उपदेश करताना म्हणाले की औ दुष्ट  विचारांच्या  माणसाला हरिनामाची आवडत प्राप्त झाल्यानंतर तो वाईट संगतीच्या लोकांपासून दुर राहतो अग्णी ज्याप्रमाणे लाकडाचे भस्म करते त्याप्रमाणे हरिनाम रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते,मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो ,जिवनात जो असंतुष्ट असतो, तो खरा  दरिद्री असतो. भगवंताचे स्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात  विद्यार्थ्यांच्या अभ्यासात होते .आज ते नाहीत,त्यामुळेच आजची पिढी बिगडत चालली आहे,त्यास शिक्षण संस्था जबाबदार आहे, व्हाट्सअप, फेसबुक मुळे मनोविकार वाढत आहे त्याला जबाबदार कोण असा सवाल करत ? ते सुधारण्यासाठी अध्यात्म - संस्कृतीची गरज आहे. परमार्थ हे महाधन आहे, रामनाम रुपी ज्याच्याकडे आहे तो श्रीमंत आहे. जगामध्ये कोणी धनवान नाही. बाकी सर्व जणदरिद्री आहे. लक्ष्मीचा जेथे मोठे पणा चालला नाही, तिथे आपण कोण? सिकंदर जब दुनिया से चला तब दोनो हात खाली थे असे सांगत महाराज म्हणाले, जग जिंकले, कितीही संपत्ती असली तरी आपण काही घेवुन जात नाही. आशेमुळे जिवनात अनेक समस्या निर्माण होतात. आशा ही माणसाला वर्तमानात ठेवत नाही, ती भविष्या गवत घेवुन जाते.  माझ्या मुलांचे नातवांचे कसे होईल, असा विचार म्हातारा करतो, पण मुले त्यांच्या मरणाची वाट पाहतात.

            मन आणि अंतकरणातील भाव याविषयी बोलतांना महंत रामगिरी महाराज म्हणाले, अनावश्यक चिंतन हे दु:खाचे कारण आहे. उन्मत हत्ती सारखे मन धावत असते. मनाला अंकूश पाहिजे. मन रथांच्या चाकाप्रमाणे फिरत राहाते त्याला मनोरथ म्हणतात. संकल्प विकल्प मनाचे स्वरुप आहे, मन हे निरर्थक चिंता करते.  माणसाने स्वतःच्या आत डोकावून स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करावा. आज पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण व मोबाईलचा वाढता अतिवापर यामुळे मनुष्य दिशाहीन झाला आहे तरुण मोबाईलच्या खेळात व्यस्त झाली आहे, तरुणाई हा समाजाचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे, त्यांनी योग्य मार्गावर चालावे यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि आपला अखंड हरिनाम सप्ताह नामस्मरण अन्नदान ज्ञानदानासाठीच आहे
आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार केल्याने माणसाला स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे, जीवनातील अडचणींना शांतपणे आणि सकारात्मक दृष्टीने सामोरे जाण्यास मदत होते.
आध्यात्मिक ज्ञान माणसाला जीवनातील अस्थिरतेतून बाहेर पडण्यास मदत करते. त्यामुळे, जीवनात स्थिरता आणि संतुलन साधता येते.  आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार युवकांनी केल्यास एक संतुलित आणि यशस्वी जीवन जगण्यास मदत होईल. असे महाराज शेवटी म्हणाले.
   आजच्या प्रवचानासह दिवसभरात खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, वैजापुरचे आ. रमेश  बोरणारे , गंगापूरचे आ.प्रशांत बंब, नांदगांवचे माजी आमदार अनिल आहेर,  अविनाश गलांडे , माजी नगरसेवक अशोक कानडे,  जि.प सदस्य शरद नवले, बाजार समिती संचालक अभिषेक खंडागळे, अशोकचे  संचालिका मंजुषाताई मुरकुटे, अशोकचे संचालक निरंजन मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे,संदिप शेलार, गणेशच्या संचालिका कमलताई  धनवटे, पोलीस पाटील शिवाजी भोसले, सोमनाथ महाले, प्रमोद भोसले,  कमलाकर कोते,पंढरीनाथ काकडे, सर्जेराव मते, नानासाहेब गाडेकर, शिवमुर्ती गोसावी, भास्कर झावरे, सागर कापसे , राजेंद्र , साळुंके, नितीन पुंड , भास्कर कुदळे, नितीन वाघमारे,विश्व हिंदू परिषदचे सुनील धनवट, मनाजी मिसाळ, सरालाबेटाचे सर्व शिष्यगण महाराज ऊपस्थित होते. विश्र्वस्त मधुकर महाराज सर्वाचे उपस्थितांचे आभार मानले.

चौकट:
आज श्रावण शुद्ध ११ पुत्रदा एकादशी निमित्ताने संभाजीनगरचे  खासदार संदिपान भुमरे, व वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे  यांच्यावतीने  ३००क्विंटल साबुदाणा, १५० क्विंटल भगर, १०० क्विंटल शेंगदाणे,२०० क्विंटल बटाटे,२०० तेल डबे,अशी भव्य शाबुदाना खिचडीची फराळाची पंगत  असून आठ लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याचाअंदाज व्यक्त केला जात  आहे

Post a Comment

0 Comments