जीवनातलं दुःख दूर करायचं असेल तर कंठी,मनी कायम नाम असू द्या--ह भ प अर्जुन महाराज चौधरी,

राजकुमार गडकरी 

शिर्डी (प्रतिनिधी) जीवनातलं दुःख दूर करायचं असेल तर नामस्मरण करा, कंठामध्ये ,मनामध्ये कायम  नाम असू द्या,त्यामुळे जीवन या संकट रुपी जलसागरतून नक्कीच तरंगून जाईल. असे नांदूरखी येथील हभप अर्जुन महाराज चौधरी यांनी सांगितले.सालाबाद प्रमाणे यावर्षीही राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र सावळीविहीर बुद्रुक येथे श्री साई सतचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला शनिवारी  9 ऑगस्टला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. प्रथम दिवशी शनिवारी रात्री झालेल्या कीर्तनात निरूपण करताना ते बोलत होते.


  ह भ प अर्जुन महाराज चौधरी यांनी आपल्या कीर्तनात अनेक दाखले देत पुढे सांगितले की, संतांनी नामस्मरण करा , कंठी मनी नेहमी ईश्वराचे नाम असू द्या,हा संदेश दिला आहे. संतांमुळेच हे अखंड हरिनाम सप्ताह होत आहेत. व ही परंपरा सुरू आहे.वारकरी संप्रदाय वाढवला आहे.  संतांमुळेच हरिनामाचा हा ईवलेसा लावलेला वेल आता गगनावरी गेला आहे. जीवनात आपल्याला येणाऱ्या अनेक संकटाचा दाह शांत होण्यासाठी कंठामध्ये नाम असले पाहिजे. चिंता घालवण्यासाठी चिंतन करा, या जगामध्ये वाचायचं असेल वाचा! चिंतन मनन करा, ग्रंथ अभंग वाचा, असे त्यांनी यावेळी कीर्तनात निरूपण करताना सांगितले. तसेच जीवनामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. दान वेगवेगळ्या प्रकारचे असतात. अखंड हरिनाम सप्ताहा साठी  दान दिले तर त्याची दखल परमेश्वर घेतल्याशिवाय राहत नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सावळीविहीर बुद्रुक येथील श्री साई सतचरित्र पारायण व हा  हरिनाम सप्ताह सोहळा असाच वर्षानुवर्ष वृद्धिंगत होत राहो असे, यावेळी त्यांनी आपण परमेश्वर कडे प्रार्थना करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमा वेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मातेरे व नितीन मातेरे यांच्याकडून महाप्रसादाची शनिवारी रात्री पंगत देण्यात आली. त्यामुळे त्यांचा महाराजांच्या हातून शाल देऊन सत्कार करण्यात आला . त्याचप्रमाणे  बाळासाहेब जनार्दन जपे, महेश नवनाथ जपे यांनी गावच्या वतीने यावेळी महाराजांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार केला. सरपंच ओमेश जपे यांनी कै. रमेश पाटील आगलावे, कै.नवनाथ पाटील जपे ,कै. विनायकराव आगलावे, यांची आठवण काढत सप्ताहातील त्यांचे योगदान मोठे होते. असे सांगितले. व शेवटी सर्व उपस्थितांचे व देणगीदारांचे आभार मानले. रविवारी दहा ऑगस्ट रोजी भागवताचार्य, शिवपुराण कथाकार हभप संतोष महाराज टिकार ,आळंदी, यांचे सुश्राव्य कीर्तन सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार आहे. व त्यानंतर  महाप्रसादाची पंगत आहे. तरी किर्तन व नंतर महाप्रसाद या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन समस्त सावळीविहीर बु. ग्रामस्थ व भजनी मंडळ, यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments