टाकळीभानच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा



टाकळीभान प्रतिनिधी- -: रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अतिशय पवित्र असा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम . शिंदे , पर्यवेक्षक एस.एस . जरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका श्रीमती डी .ए . पांढरे तर प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती एन .ए . पालवे आदी मान्यवर उपस्थित होते .
   यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती डी . ए. पांढरे म्हणाल्या की ,भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन सणाला प्राचीन इतिहास लाभलेला आहे . बहिण भावाच्या अतुट नात्याची परंपरा सर्वांनी जपली पाहिजे असे आवाहन यावेळी त्यांनी केले . कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती एन .ए .पालवे यांनी प्राचीन काळातील बहिण भावाच्या अतूट नात्याची उदाहरणे विद्यार्थ्यांना देऊन समाजातील प्रत्येक मुलीचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे असे आवाहन यावेळी केले .
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचा विद्यार्थी रुद्र शिंगोटे याने तर आभार हर्षवर्धन वाघमारे 
यांनी व्यक्त केले .

Post a Comment

0 Comments