दिलीप लोखंडे
टाकळीभान(प्रतिनिधी)—गावात कुठेही गुन्हेगारी कृत्य घडत असेल तर त्या बाबतचे चित्रीकरण अथवा फोटो तुम्ही आम्हांला पाठवा. कारण तुम्ही सजग नागरीकच पोलीस खात्याचे डोळे आहात. तांदळातील खड्यासारखे गुन्हेगारांना निवडून त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी माझी आहे. तुमच्या सहकार्याने टाकळीभान येथील गुन्हेगारी मी झिरो करतो. असा विश्वास श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पो.नि.धनवडे यांनी येथील ग्रामस्थांना दिला.
आगामी येवू घातलेल्या सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर टाकळीभान पोलीस स्टेशनमध्ये शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी धनवडे हे बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर माजी सभापती नानासाहेब पवार, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, डाॅ.श्रीकांत भालेराव, रमेश धुमाळ, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताने पो.नि.धनवडे म्हणाले की, अहिल्यानगर हा जिल्हा अतिसंवेदनशील आहे हे ऐकूण होतो. मात्र या जिल्ह्यातील टाकळीभान या गावातील लोक गुण्यागोविंदाने नांदतात हे पाहून आनंद वाटला असला तरी गाव तिथे बाराभानगडी असतातच असेही त्यांनी यावेळी नमूद केले. पोलीस हे जनतेसाठीच २४ तास काम करतात. आम्हांला आमचे काम करत असतानेच सजग नागरीक म्हणून तुमच्याही सहकार्याची आम्हांला आवश्यकता आहे. गावात कुठे काही अनूचित प्रकार घडत असल्याचे तुमच्या लक्षात येताच त्याबाबतचे मोबाईल मध्ये चित्रिकरण अथवा त्याचा फोटो घेवून तुम्ही मला पाठवा. त्याच्या आधारे मी गुन्हेगाराचा बंदोबस्त करतो. असे त्यांनी यावेळी सांगून आगामी सण व उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
टाकळीभान पोलीस स्टेशनला कर्मचारी नाही. तरी कायम स्वरूपी या ठिकाणी पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करावी अशी मागणी यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार यांनी केली.
राजेंद्र कोकणे यांनी आम्ही गावात शांतता राहण्यासाठी सदैव बांधील असल्याचे सांगून पोलीस प्रशासनाला आमचे कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. नारायण काळे यांनी गणपती विसर्जनाच्या वेळेस येथील टेलटॅंकवर दोन कर्मचारी नियुक्त करावे जेणेकरून कुठलाही अपघात होणार नाही अशी मागणी केली.
यावेळी,आबासाहेब रणनवरे, सुप्रिया धुमाळ, प्रकाश धुमाळ, अमोल पटारे, संजय रणनवरे, पो.ना.अनिल शेंगाळे, बाबा सय्यद, भाऊसाहेब पटार, विशाल पटारे, शंकरराव पवार, करीमभाई देशमुख, अशोक धोत्रे, चित्रसेन रणनवरे, सुंदर रणनवरे, भैया पठाण, गजानन कोकणे, बंडू कोकणे, मधूकर गायकवाड, अक्षय कोकणे, धनराज कोकणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट-माझ्या तीस वर्षाच्या सर्विस मध्ये 25 वेळा बदला झाला आहे, तुकाराम मुंडे नंतर माझाच नंबर आहे,-पो, नि,धनवडे,
चौकट—या शांतता बैठकीत पो.नि.धनवडे यांनी मा. गृहमंत्री केंद्र सरकार व मा. पोलिस महासंचालक यांनी जनजागृतीपर जारी केलेल्या गाईडलाइन प्रमाणे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती, सायबर क्राईम, वाढती गुन्हेगारी, आरोग्य पुनवर्सन, डिजीटल सोशल मीडिया, नवीन कायदे एन एस एस, एन सी सी बाबत माहिती देऊन
ग्रामस्थांना योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.
0 Comments