दिलीप शिंदे
सोयगाव दि.१४ -गर्भलिंग विरोधी कायदा ( पिसिपीएनडीटी ) च्या जनजागरणासाठी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दि.१४ गुरुवारी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्या सन्मान दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात उपस्थित महिलांना डॉ. शैलेश खंदारे यांनी मुली व मुलांच्या संख्येत तफावत असून ही तफावत कमी करणे ही काळाची गरज आहे.
आपण जागरूक राहावे व इतरांना पण जागरूक राहण्यासाठी जनजागृती करावी. मुलींच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी गर्भलिंग तपासणी करणेसाठी कायद्याने बंदी आहे. स्री -पुरुष प्रमाण हे समाधानकारक नसल्याने, मुलींची संख्या वाढावी या करिता सर्वांनी कायद्याचे पालन करावे असे आवाहन केले. पिसिपीएनडिटी कायद्या विषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी कन्या दिवसाची शपथ घेतली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल डोके, सुनील वानखेडे , परिचारिका सीमा फुले , सोनाली झिंजे, समुपदेशक अतुल मुळे, औषध निर्माण अधिकारी भूषण चव्हाण आदींसह महिलांची उपस्थित होती.
0 Comments