सोयगाव तालुक्यात १७ दिवसापासून पावसाची दांडी, पीक करपली,शेतकरी हवालदिल --


 
दिलीप शिंदे 
सोयगाव दि.११ सोयगाव सह तालुक्यात २२ जुलै पासून पावसाने खंड दिला आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील ४२,६४५ हेक्टरवरील खरिपाच्या पिके तहानलेली आहे दरम्यान पावसाचा खंड आहे उन्हाची वाढती तीव्रता यामुळे पिकांवर ताण पडला आहे मक्याची पिकं तुर्यावर आली असतांना पावसाची गरज आहे परंतु सोयगाव तालुक्यावर निसर्ग कोपला आहे. चारही महसूल मंडळात दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली.

 आहे.हंगामाच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी वेळेच्या आत पिकाची लागवड केली आहे. परंतु आता मात्र पावसाने अचानक दडी मारल्याने जमीन कोरडी पडली असून जमिनीला भेगा पडल्या आहेत. या कोरडेपणामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आली आहेत.
सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीचे उत्पादन घेतले जाते. यंदा तालुक्यात २५,९४३ हेक्टर वर कपाशी ची लागवड असून ९,३७४ हेक्टरवर मक्याची लागवड आहे परंतु सध्या मक्याला मुबलक प्रमाणात पावसाची अत्यंत गरज आहे. पिकाला पाणी मिळाले नाही तर वाढ थांबून पिकावर कीड पडण्याचा धोका असतो. रोगराई पसरण्यास सुरुवात होते. अशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. गेल्या १७ दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे कोरडवाहू आणि सिंचनावर अवलंबून असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेषतः सोयगाव, सावळदबारा आणि जरंडी  या परिसरात मागील २० दिवसांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याचा फटका या हंगामात बसण्याची शक्यता आहे.
भर पावसाळा सुरु असताना देखील मक्याची शेती अशी भेगाळली आहे. कपाशी तग धरून आहे आगामी तीन दिवसांत पाऊस न आल्यास कापूस पिकें देखील करपण्याच्या मार्गावर असल्याने उद्याची काळजी दाटली आहे.

चौकट;-भर पावसाळ्यात शेतात पडल्या भेगा-- 
पाण्याची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला लागवड केली. पण दिवसेंदिवस वाढत्या उन्हासोबत शेतातील पाणी मोठ्या प्रमाणात जिरत आहे. त्यातच वेळेवर वीजपुरवठा मिळत नसल्याने सिंचनाची सोय असूनही जमिनीला भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात ही वेदनादायक स्थिती आहे.बहुतांश शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक सुरळीत वाढावे म्हणून भरपूर खर्च करून खत आणि रासायनिक औषधांची फवारणी केली आहे. सिंचनाची सोय असल्याने थोडाफार दिलासा असला तरी बहुतांश शेतकरी पावसावर पूर्णतः अवलंबून आहेत. पाहिजे त्या प्रमाणात शेतात पाणी नसल्याने फवारण्या केलेले औषधे आणि खते बिनकामी झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावण्याची शक्यता आहे.

शेतकरी प्रतिक्रिया-१)काही दिवसांपूर्वी पावसाने रिमझिम सुरुवात केली असताना अनेक शेतकऱ्यांनी कपाशी व मका लागवड केली. मात्र आता पाऊस अचानक गायब झाला आहे. त्यामुळे पिके सुकण्याची वेळ आली आहे. आकाशाकडे पाहून हात जोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
ज्ञानेश्वर युवरे, शेतकरी घोसला.

Post a Comment

0 Comments