लोहगाव (वार्ताहर): प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात नुकताच ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
प्राचार्य विनायक मेथवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयातील छात्रसैनिकांनी दीपक धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट ध्वजसंचलन केले. या उत्कृष्ट ध्वजसंचालनाबद्दल प्राचार्य विनायक मेथवडे यांनी छात्रसैनिकांना १००१ रुपये बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी कन्या व मुले विभागातील विद्यार्थ्यांनी विविध गीते, नृत्य गायन सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संकुलात स्वातंत्र्यपर रॅली, कवायत, पसायदान व राखी बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली. तसेच वृक्षांना राखी बांधण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थिनी सादर केला. यावेळी विनायक मेथवडे व मुख्याध्यापिका नलिनी जाधव यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपप्राचार्य अलका आहेर, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, पालक विलास सोनवणे, राहुल सोनवणे, गुलाब शेख आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलास गभाले यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ विद्यार्थ्यांना शपथ दिली. हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शरद दुधाट, रेणुका वर्पे, माधुरी वडघुले, संगीता उगले, क्रीडा विभाग प्रमुख शिवप्रसाद जंगम, छात्रसेना प्रमुख दीपक धोत्रे, नरेंद्र ठाकरे, संजय ठाकरे, संजय डुबे, परते सर, बाबासाहेब अंत्रे व शिक्षकेतर सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
0 Comments