आंबी अंमळनेर येथे वैकुंठवासी गुरुवर्य विश्वनाथबाबा पुण्यतिथी उत्सव




आंबी (वार्ताहर)राहुरी तालुक्यातील अमृतवाहिनी प्रवरा माईच्या कुशित विसालेल्या आंबी अंमळनेर येथे वै.प.पूज्य गुरुवर्य ह.भ.प. विश्वनाथबाबा यांच्या ४३ व्या पुण्यतिथी निमित, वै.ह भ.प.अण्णासाहेब महाराज आनंदे व वै.शामराव महाराज सैदाणे यांच्या प्रे'रणेने ह.भ.प. उल्हासजी महाराज सुर्यवंशी यांच्या अधिपत्याखाली सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात सुरु आहे.या सप्ताहकाळात ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के, उमेशजी महराज बडाख, दिपकजी महराज देशमुख, मनोहरजी महाराज सिनारे,महंत अर्जुनजी महाराज श्रीक्षेत्र ताहराबाद, मुरारजी महाराज आनंदे,आदिनाथ महाराज फपाळ यांची सायंकाळी ७ ते ९ वा.किर्तनाचे आयोजन करण्यात येऊन नंतर अन्नदाते यांचे कडून भाविकांना आमटी भाकरीचा महाप्रसाद देण्यात येतो.या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवार रोजी आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक ह.भ.प. गुरुवर्य उल्हासजी महाराज सुर्यवंशी यांचे काल्याचे हरिकिर्तन होऊन महाप्रसादाने होणार आहे.

  आंबी अंमळनेर वै हभप.धुंडा महाराज देगुलकर, संत गाडगे महाराज, बंकट स्वामी महाराज, बाबा महाराज सातरकर,सदानंद गुरुजी,पांडूरंग महाराज वैद्य,विठ्ठल महाराज चौधरी आदि संत महात्म्याच्या पदस्पर्शाने पुणीत झालेली ही भूमी आहे. या प्रतिआळंदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबी अंमळनेर या गावाला १९५४ पासून सप्ताहाची परंपरा आहे, प्रयेक श्रावण महिन्यात दोन वेळेस ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रवचन सांगितले जाते.प्रारंभी वै.गुरुवर्य बाबुराव महाराज आनंदे, वैकुंठवासी विश्वनाथ बाबा थोरात,वै.शामराव महाराज सैदाणे नंतर ह.भ.प.उल्हासजी महराज,कृष्णाजी महाराज यांच्या अमृतवाणीतून आजतागायत चालूआहे.श्री अंबिकेश्वर भगवान व साधू संताच्या कृपाशिर्वादाने सर्व जाती धर्माचे येथे लोक गुण्यागोविंदाने राहात आहे.

Post a Comment

0 Comments