महाराष्ट्रात पंथ ,संत ,ग्रंथ व पांडुरंगा सारखे आहेत भगवंत, म्हणून येथे जन्मलो आपण भाग्यवंत--ह भ प सुरेश महाराज आढाव .कन्नड,

शिर्डी (प्रतिनिधी )महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .या देशात या राज्यात पंथ आहेत.ग्रंथ आहे. संत आहे व पांडुरंगा सारखे भगवंत आहे. येथे पंथ दाखवतात ग्रंथ तर ग्रंथ दाखवतात संत व संत दाखवतात भगवंत, म्हणून आपण अशा पवित्र भारतात जन्माला आलो .


या संतांच्या भूमीत महाराष्ट्रात जन्माला आलो म्हणून आपण भाग्यशाली आहोत असे प्रतिपादन हभप सुरेश महाराज आढाव कन्नड यांनी केलं. राहता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथे श्री साई सतचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित कीर्तन महोत्सवाचे चौथे पुष्पगुंफताना ह भ प सुरेश महाराज आढाव कन्नड यांनी अनेक दृष्टांत देत आपल्या कीर्तनाचे निरूपण करताना पुढे म्हटले , भारतासारखा पवित्र देश या जगाच्या पाठीवर कोठे नाही. जगात अनेक देश आहेत. पण प्रत्येक देशाकडे वेगवेगळ्या नजरेने ,दृष्टिकोनातून पाहिले जाते. अमेरिकेकडे जगाची तिजोरी म्हणून पाहिले जाते तर चीनकडे शस्त्र घर असे म्हटले जाते. फ्रान्सला फॅशन शो तर पाकला घाणेरडा देश संबोधले जाते. पण भारताला देवघर म्हणून पाहिले जाते. अशा या भारतात आपण जन्माला आलो त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व श्री साईबाबांच्या या पुण्यभूमी असणाऱ्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो म्हणून आपण भाग्यशाली आहोत. आपण भाग्यशाली आहोत कारण ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीतून संतांनी दिलेली शिकवण प्रत्येकाने आचरणात आणावी नामस्मरण ,नाम चिंतन करावं. कोणत्याही व्यक्तीला या जीवनात सफल होण्यासाठी प्रथम संतांची गरज आहे. प्रथम नतमस्तक व्हायचं असेल तर प्रथम संतांच्या चरणावर व्हा. नक्कीच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असं त्यांनी यावेळी सांगितलं. कीर्तनानंतर हभप सुरेश महाराज आढाव कन्नड यांचा राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, सरपंच ओमेश जपे यांनी समस्त  गावकरी मंडळाच्या वतीने सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. कीर्तनासाठी विणेकरी ह भ प मनोज बिडवे महाराज, गायनाचार्य रावसाहेब वेताळ व किरण महाराज हारळे, तसेच मृदंगाचार्य संदीप महाराज वैद्य, साऊंड सिस्टिम प्रवीण महाराज कुदळ, त्याचप्रमाणे भजनी मंडळातील सुरेश जपे ,संभाजी जपे, बबनराव जपे, रामदास आगलावे, सुभाष पोपळघट,गोविंद जपे, रोहिदास जपे, श्रीमती मंदाताई आगलावे, आदीसह भजनी मंडळातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. कीर्तनापूर्वी श्री हनुमान मंदिरामध्ये हरिपाठ संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments