तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव येथे बैठक संपन्न--



दिलीप शिंदे
सोयगाव दि.१३-- छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि तालुका क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा व तालुका पातळीवरील प्रमुख क्रीडा अधिकारी, क्रीडा शिक्षक, संयोजक आणि मान्यवर उपस्थित होते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा अधिकारी मुकुंद वारकर,  सचिन पुरी, खंडू यादवराव, गणेश पाळवंदे,  तालुका क्रीडा संयोजक डॉ. निलेश गाडेकर उपस्थित होते.या बैठकीत विविध क्रीडा स्पर्धांचे तांत्रिक प्रशिक्षण, नियमावली आणि नियोजन या बाबत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. नियोजित तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, फुटबॉल, सॉफ्टबॉल, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, योगासन, मैदानी स्पर्धा आणि कुस्ती (फ्रीस्टाईल व ग्रीको-रोमन) यांचा समावेश असून, त्यांच्या आयोजनासाठी तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. क्रीडा अधिकारी  मुकुंद वारकर यांनी उपस्थित शिक्षक व क्रीडा शिक्षकांना स्पर्धांचे यशस्वी आयोजन, विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग, स्पर्धांचे तांत्रिक अडथळे, नवीन नियम व शिस्तबद्धता याविषयी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रती उत्साह वाढविण्यासाठी शाळा व महाविद्यालयांनी सक्रीय भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले.प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी बैठकीच्या अध्यक्षीय भाषणात, सोयगाव येथील तालुका क्रीडा संकुलाचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावावे, जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा दिल्यास त्यांच्यातील कौशल्य अधिक विकसित होऊ शकते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश गाडेकर यांनी केले तर प्रा. शेख तोफिक यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments