शिर्डीत “एक में अनेक” हिंदी संगीतमय नाटकाचे आयोजन



शिर्डी (प्रतिनिधी) – साई समर्पण ग्रुप, न्यूयॉर्क (अमेरिका) तर्फे साईबाबांच्या जीवनावर आधारित “एक में अनेक” या हिंदी संगीतमय नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. हे नाटक शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 7.00 ते रात्री 9.30 या वेळेत श्रीसाई शताब्दी मंडप (१६ गुंठे) येथे रंगणार आहे.

विशेष म्हणजे या नाटकात परदेशातील साईभक्त कलाकारांसोबत शिर्डीतील काही बालकलाकार व अन्य कलाकारही सहभागी होणार आहेत. आयोजकांनी सर्व साईभक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कलाकारांना प्रोत्साहन द्यावे आणि शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments