नळाला पाणी येत नसल्याने वांगी ग्रामपंचायत कार्यालय समोर साड्या व कपडे जाळून महिलेचे अनोखे आंदोलन,

दिलीप लोखंडे 

टाकळीभान - प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील वांगी येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात नळाचे पाणी वेळेवर येत नसल्यामुळे व पाच ते दहा मिनिट पाणी सोडत असल्याने, पाण्यासाठी ग्रामपंचायत च्या समोर कपडे जाळून महिलेने केले अनोखे आंदोलन, 

       वांगी येथील एकल महिला गटाच्या अनिता आव्हाड यांनी ग्रामपंचायतीचे पाणी कधीच वेळेवर येत नसल्यामुळे व आले तर फक्त दोन-तीन हांडेच भरले जातात लगेच पाणी बंद होते व पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्यामुळे  
 ,अनेक वेळा तक्रार करूनही या ग्रामपंचायतच्या कारभार कोणतीच सुधारणा होत नसल्यामुळे शेवटी अनिता आव्हाड यांनी प्रशासनाच्या विरोधात कपडे व साड्या ग्रामपंचायत समोर आणून त्या साड्यांची होळी करून अनोखे आंदोलन करण्यात आले, जर लवकरच ग्रामपंचायत  प्रशासनाचे निळ पाणी योजनेत सुधारणा नाही केल्यास,  एकल महिला संघटनेच्या वतीने पंचायत समिती समोर येऊन आंदोलन करणार, असाही इशारा देण्यात आला आहे,

Post a Comment

0 Comments