श्री क्षेत्र वरद विनायक सेवाधाम लोणी येथे अंगारकी चतुर्थी निमित्त दिंड्यांचे आगमन


 

सादतपुर (वार्ताहर)

 ह भ प श्री भाऊसाहेब महाराज काळे  भक्त मंडळाच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो की
योगीराज सदगुरु गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि महंत ब्रह्मलीन सदगुरु नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच गुरुवार्य महंत ह भ प श्री श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदगुरु व साधतेश्र्वर शिवभगवान श्री क्षेत्र सादतपूर ते श्री क्षेत्र वरदविनायक सेवा धाम लोणी खुर्द अंगारक चतुर्थी असल्यामुळे पंचक्रोशीतून पायी दिंडी सोहळा भाविक भक्तांच्या अग्रस्थ आयोजित करण्यात आला होता.

 या सोहळ्यासाठी आपल्या सादतपुर गावातून मोठ्या संख्येने भाविक आपल्या माता भगिनी  उपस्थित होत्या .हा पाई दिंडी सोहळा खूप उत्साहात झाला श्री सदगुरु महाराज आणि साधतेश्वर शिव भगवान यांचा आशीर्वाद घेऊन दिंडी प्रस्थान करून दिंडी श्री गणेशाच्या दर्शना साठी मार्गस्थ झाली मार्गात दिंडीला भाविक .ह भ प श्री दत्तात्रय पानसरे पाटील व त्यांच्या भगिनी यांच्याकडून दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत व विधिवत पूजा केली व चहा आणि फराळाचा नाष्टा झाला त्यानंतर दिंडी श्री गणेशाच्या दर्शना साठी मार्गस्थ झाली तसेच दिंडी लोमेश्वर देवस्थान लोणी खुर्द येथे ह भ प वेणूनाथ महाराज विखे पाटील  यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला*


 त्यानंतर दिंडी वरद विनायक सेवाधाम कडे मार्गस्थ झाली दिंडी वरद विनायक सेवा धाम येथे पोहोचता सेवाधाम कडून मोठ्या उत्साहात दिंडीचे स्वागत झाले .दिंडीमध्ये मोठ्या संख्येने महिलाभगिनी यांनी आनंदाने व मोठ्या उत्साहाने फुगडीचा व भजनचा आनंद घेतला व त्यानंतर *श्री गणेशाचे दर्शन व महंत श्री उद्धवजी महाराज यांचेही दर्शन घेण्याचा लाभ प्राप्त केला व मोठ्या उत्साहात फराळ व आमटी भाकरी चा आस्वाद घेतला मला भक्त मंडळाच्या वतीने मोठ्या अभिमानाने सर्व भावीक बंधू व माता-भगिनी यांचे विशेष आभार व्यक्त करताना खूप आनंद होतो.
या दिंडी सोहळ्यासाठी विशेष सहकार्य भाविकांकडून मोठ्या प्रमाणात झाले त्यामध्ये विशेष योगदान आपल्या गावचे .ह भ प पानसरे सर आईसाहेब मंगल कार्यालयचे प्रमुख यांच्याकडून रथाची व श्री गणेशाची मूर्ती मिळाली.
त्याचबरोबर ‌ह भ प श्री नानासाहेब खाडे गोगलगाव* यांच्याकडूनही आपल्याला साऊंड सिस्टम ची मदत मिळाली 
 गावचे माजी सरपंच व प्रवरा बँकेचे संचालक श्री बबनराव काळे पाटील* यांच्याकडूनही आपल्याला पाणी जार व भाविकांना परतीच्या प्रवासासाठी गाडीची सेवा मिळाली 
त्याचबरोबर दिंडी सोहळ्यात विशेष प्रवचन व मार्गदर्शन आपले पंचक्रोशीतील  ह भ प वेनुनाथ महाराज विखे पाटील* यांच्याकडून मिळाले.
आपल्या गावचे तरुण भाविक *ह भ प नारायण काळे पाटील यांच्याकडून रथासाठी ट्रॅक्टर* चे सहकार्य मिळाले .
तसेच आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते ह भ प श्री बाबासाहेब कडलग.व ह भ प श्री गणपत मगर यांचेही विशेष सहकार्य मिळाले(विना मोबदला)
मी पुन्हा एकदा भक्त मंडळाच्या वतीने सर्व ग्रामस्थ भाविक माता भगिनी, भजनी मंडळ यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद  .... 
         

Post a Comment

0 Comments