टाकळीभान (प्रतिनिधी)
श्रीरामपूर शहरातील विविध भागांना अजूनही चिकटून असलेली जातीयवाचक नावे तात्काळ रद्द करून त्याऐवजी साधू-संत आणि राष्ट्रपुरुषांची नावे देण्याची मागणी कामगार नेते नागेशभाई सावंत यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेकडे केली आहे. ही नावे बदलली नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेने पूर्वी शासकीय दप्तरी धनगर वस्ती, सुभेदार वस्ती, झिरंगे वस्ती, देवकर वस्ती, दळवी वस्ती, खबडी, नवी दिल्ली, वैदूवाडा,
जवाहर वस्ती, मोरगे वस्ती, मावलाईचा मळा, डावखर चौक, इस्लामपुरा चौक, गुलशन चौक, नॉर्दन ब्रँच, सोनार गल्ली, सुभाष कॉलनी, खिलारी वस्ती, फकीरवाडा, भैय्या गल्ली, यादवनगर, भोंगळे वस्ती, निरवासी गल्ली, सिंधी कॉलनी, फतेह चौक, बाबरपुरा चौक, घास गल्ली, इराणी मोहल्ला, अचानक नगर, कुरेशी मोहल्ला, मातंग वाडा, चांभार वाडा, कुंभार गल्ली, वडार वाडा, तलवार बिल्डिंग, माटा कॉलनी, बेलदार वस्ती, दुबई गल्ली, गौड गल्ली, शिकलरी मोहल्ला, हुसेन नगर, जिनिंग प्रेस
परिसर, वडाळा पाटबंधारे विभाग, गोपाळ वाडा, लोणार गल्ली, पठाण वस्ती, हरिजन कॉलनी, कॅनॉल झोपडपट्टी यासह इतर अनेक नावाने नोंदी केल्या आहेत.
याचबरोबर, काही व्यक्ती आणि संघटनांनी वेगवेगळ्या नांवाचे फलक लावून काही नावे बेकायदेशीरपणे वापरण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मतदार यादी, रेशनकार्ड, आधारकार्ड, मुलांच्या शाळेच्यादाखल्यांवरही याच नावाने नोंदी सुरू आहेत आणि आजही त्या तशाच चालू आहेत. अनेक नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. शहरातील काही भागातील नागरिकांचा इतर भागाशी काहीही संबंध नसताना, त्यांच्या आधारकार्डवर चुकीचा वॉर्ड क्रमांक टाकण्यात येत आहे. विशेषतः, सर्व व्यवहार रेल्वे लाईनच्या उजव्या बाजूने होत असताना काही नागरिकांच्याआधारकार्डवर पत्त्यावर वॉर्ड क्रमांक २ २ असा उल्लेख येतो, ज्यामुळे त्यांना बँक आणि इतर व्यवहार करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. कामगार नेते नागेशभाई सावंत यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, शहराला अजूनही चिकटून असलेली ही जातीयवाचक नावे समाजावर नकारात्मक परिणाम करत आहेत. भावी पिढीच्या मनावर याचा चुकीचा ठसा उमटण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रपुरुषांनी केलेल्या समाजकार्याचा ठसा भावी पिढीच्या मनावरउमटल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा इतिहास हा भावीपिढीला प्रेरणा व स्फूर्तीदायक ठरेल, असे सावंत यांनी म्हटले आहे.
साधू-संत करण्यासाठी आणि सर्वधर्मीय नागरिकांची बैठक बोलावून सध्या असलेली ही सर्व जातीयवाचक नावे त्वरित रद्द करावीत, अशी मागणी नागेशभाई सावंत यांनी नगरपरिषदेकडे केली आहे. अन्यथा, या विरोधात उग्र आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी ही नावे बदलणे अत्यंत महत्त्वाचे असून, नगरपरिषदेने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा
0 Comments