श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षकपदी सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती,



टाकळीभान प्रतिनिधी-: श्रीरामपूर अप्पर पोलीसअधिक्षकपदी सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच ते आपल्या पदाचा पदभार स्विकारणार आहे.


गेली काही दिवसापासून श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक पद हे रिक्त होते. या पदावर नूकतीच सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या सोमनाथ वाघचौरे हे राज्य राखीव बल गट क्रं.५ दौंड येथे समादेशक (कमांडंट) म्हणून कार्यरत होते. यापूर्वी सोमनाथ वाघचौरे यांनी श्रीरामपूर व संगमनेर येथे डिवायएसपी म्हणून काम केलेले असल्याने त्यांना या तालुक्यांची जाण आहे. आपल्या डिवाय एसपी पदाच्या कार्यकाळात त्यांनी श्रीरामपूर तालुक्यात उत्कृष्ठ काम केले होते. दौंड येथेही राज्य राखीव बल गट क्रं.५ येथेही त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक पदी त्यांची नियुक्ती झाल्याने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments