दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.०८ – भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५ अंतर्गत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोयगाव येथील आदर्श युवा शिक्षक प्रणव प्रमोद कुलकर्णी यांना राष्ट्रीय समाजभूषण गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान महाराष्ट्र राज्यातील नामांकित ए. डी. फाउंडेशन संस्थेकडून दिला जात असून, त्यांनी देशभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली.
जाते. प्रणय कुलकर्णी यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व आत्मविश्वास निर्माण व्हावा, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासह समाज प्रबोधनासाठी उल्लेखनीय कार्य करीत आहे. त्यांच्या शिक्षणातील नवोपक्रम, विद्यार्थ्यांसाठी दिलेलं मार्गदर्शन, आणि सामाजिक कार्यातील सहभाग पाहून त्यांची पुरस्कार निवड समितीने राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार २०२५ साठी निवड केली आहे. संस्थापक अशोक श्रीपती गोरड यांच्या नेतृत्वाखाली दिला जाणारा आहे. या निवडीबद्दल कुलकर्णी यांचे शिक्षक जगदीश जगताप, समाजसेवक अमोल निकम,दत्तू रोकडे, शाम पाटील,तुकाराम सोनवणे,राम फुसे,महेश मानकर, रामू सोहनी,दिलीप सुरडकर, भगवान कोथलकर,शुभम जाधव, गयास पठाण आदींनी अभिनंदन केले.
0 Comments