हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यव्यापी मेळावा संपन्न





श्रीरामपूर (प्रतिनिधी) नंदकुमार बगाडे 

 हिंदू एकता आंदोलन पक्षाचा शुक्रवार, दि.१८ रोजी राज्यव्यापी मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये पक्षाची पुणे व सांगली जिल्ह्यातील १७० जणांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उज्वला गौड यांची पश्चिम महाराष्ट्र महिला संघटना आघाडीप्रमुख, प्रियंका आहेरराव यांची नाशिक शहर महिला आघाडी अध्यक्ष,  धनश्री हरकरे पुणे जिल्हा महिला आघाडीप्रमुख, संतोष जगताप यांची हिंदू एकता आंदोलन पक्ष व संघटना पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी अशी दोन्ही जबाबदारी देण्यात आली. 


अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष बी.एम.पवार, श्रीरामपुर शहर अध्यक्ष मंगेश छतवानी,रवीभाई संघवी पुणे शहराध्यक्ष, राजेंद्र जाधव पुणे जिल्हा उपाध्यक्ष, वीरस्वामी पेरला पुणे जिल्हा सरचिटणीस, प्रविण खंडागळे पुणे शहर उपाध्यक्ष, राजाभाऊ मोरे पुणे शहर उपाध्यक्ष, सरदार शेळके सांगली जिल्हाप्रमुख, संतोष जाधव पुणे शहर सरचिटणीस अशा अनेक नियुक्त्या करण्यात आल्या.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी म्हणाले, तेलंगना, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार येथे पक्षाची स्थापना करून पदाधिकार्‍यांच्या निवडी केल्या. राज्यात लव जिहादच्या विरोधात आंदोलन उभे करून समाजामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. जिहादी झांगरू पीर  याने हजारो हिंदू मुलींना फसवून त्यांचे धर्मांतर केले. एवढेच करून तो थांबला नाही तर त्याच्याकडे दीडशे कोटीच्या वर मालमत्ता आहे. ही मालमत्ता कोठून आली? सदरची दीडशे कोटीची मालमत्ता सरकारने ताब्यात घेऊन पिडीत महिलांना मोबदला म्हणून द्यावी व त्याला अटक करावी, अशी मागणी केली. 
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे म्हणाले, गेली १५ ते २० वर्षे शिवसेना भाजपला विधानसभा लोकसभेला पाठिंबा देवून हिंदू एक आंदोलन पक्षाचे कार्यकर्ते त्यांची सत्ता आणतात. परंतु, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होणार यात वाद घालत बसतातण परंतु, हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या पदाधिकार्‍यांना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. म्हणून त्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी येथून पुढच्या निवडणुका स्वबळाव लढविणार आहे. हिंदुत्ववादी विचार गेली ३० वर्षे हिंदू एकता आंदोलनकडे असल्यामुळे समान नागरी कायदा, गोहत्त्या बंदी, काश्र्मीरचे ३७० वे कलम, अयोध्येत राम मंदिर, भयमुक्त महाराष्ट्र, शेतकर्‍यांची कर्जमाफी याविषयी आंदोलन करून जनजागृती केली. म्हणून खरे हिंदुत्व हिंदू एकता आंदोलन पक्षाकडेच असल्याचे महाराष्ट्रातल्या युवकांना वाटत आहे. म्हणूनच ते आता हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. 
संतोष जगताप म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात पूर्ण दौरा करून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मीरज येथे पक्षाची भक्कमपणे बांधणी करून तेथील निवडणुकीत लक्ष घालून कार्यकर्त्यांना निवडून आणणार आहे. तसेच गाव तेथे शाखा करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवणार आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस दिपक ढवळे यांचेही भाषण झाले व पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कापसे यांनी सूत्रसंचालक करून आभार मानले. 
मेळाव्यात येणार्‍या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष स्वबळावर लढविणार असून या विषयावर विचारविनिमय करण्यात येणार आहे. तसेच नवीन युवकांना कार्यकारिणीमध्ये देवून समाजसेवेची संधी देण्यात येणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना येत्या निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. हा मेळावा श्रेयस सिद्धी बैंक्वेट हॉल, लोटस बिल्डींग, पंचमी हॉटेलजवळ, पुणे सातारा रोड येथे झाला. या मेळाव्यास नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, ठाणे आदी ठिकाणाहून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments