टाकळीभानमध्ये आरोग्यसेवकांचा मानाचा सन्मान – डॉक्टर्स डे निमित्त शिवसेना, पत्रकार सेवा संस्था आणि मयुर पटारे युवा मंचचा उपक्रम


दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी- डॉक्टर्स डे २०२५ निमित्ताने शिवसेना टाकळीभान,पत्रकार सेवा संस्था आणि मयुर पटारे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळीभान गावात भव्य सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात गावातील सर्व डॉक्टर, पशुवैद्यकीय डॉक्टर, मेडिकल स्टोअर्सचे चालक, लॅब असिस्टंट्स व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांना मानचिन्ह व सन्मान देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 

या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, ज्येष्ठ डॉ. श्रीकांत भालेराव, ज्येष्ठ डॉ.अनिल गंगवाल, ज्येष्ठ , ज्येष्ठ डॉ. दिलीप जगताप, पशुवैद्यकीय डॉ. नवनाथ पटारे, पशुवैद्यकीय अधिकारी शिवम दहिफळे,    भाऊसाहेब पटारे, मच्छिंद्र कोकणे, शिवाजी पवार, संजय पटारे, शिवाजी पटारे, संदीप कोकणे, बाबासाहेब थोरात, पत्रकार चंद्रकांत लांडगे,विजय देवळालकर, दिलीप लोखंडे, अशोक रणनवरे, संदीप बोडखे, राम अरगडे हे उपस्थित होते.
  यावेळी बोलताना ज्येष्ठ डॉ. श्रीकांत भालेराव म्हणाले की मी गेली ५० वर्षं टाकळीभान गावात डॉक्टर म्हणून सेवा देत आहे. या काळात केवळ रुग्णांवर उपचारच केले नाहीत, तर त्यांचं दुःख, भीती आणि आशा जवळून अनुभवली.
गावातील माणसांचे प्रेम, विश्वास आणि मन:पूर्वक केलेले ‘धन्यवाद डॉक्टर’ हेच खरे पारितोषिक आहे. मी जे काही शिकलो, ते या गावाच्या माणसांमुळे. त्यांचं ऋण कधी फेडता येणार नाही. आजचा हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नव्हे, तर एक भावनिक क्षण आहे. मयुर पटारे युवा मंचने घेतलेला पुढाकार खरोखरच अनुकरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.
   लोकसेवा विकास आघाडीचे शिवाजीराव शिंदे यांनी डॉ. श्रीकांत भालेराव, डॉ. अनिल गंगवाल,  डॉ. दिलीप जगताप यांनी गावासाठी तब्बल पन्नास वर्षांपेक्षा जास्त वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले की डॉक्टर, पशुवैद्यकीय अधिकारी, मेडिकल स्टोअर चालक, लॅब असिस्टंट –
हे सर्वजण आपल्या गावाच्या आरोग्य रक्षणासाठी २४ तास तत्पर असतात. ते केवळ व्यावसायिक नाहीत, तर समाजाचे ‘निस्वार्थ सेवक’ आहेत. आजच्या या डॉक्टर्स डे च्या निमित्ताने त्यांचा सन्मान म्हणजे गावकऱ्यांच्या मनातील कृतज्ञतेचा उद्गार आहे.

याप्रसंगी डॉ. निलेश गंगवाल डॉ. सतीश गलांडे, डॉ. बोरुडे, माजी उपसरपंच पाराजी पटारे, यानी आपले मनोगत व्यक्त केले.
   यावेळी  डॉ. सोनल भालेराव डॉ खेडकर मॅडम, डॉ.,  बाळासाहेब लोखंडे, डॉ . महेंद्र मिरीकर,  डॉ. निलेश कांबळे, डॉ.सत्यवान रणवरे, डॉ. सतीश गलांडे, पशु वैद्यकीय डॉ.विकास नवले, डॉ. भाऊसाहेब लोखंडे, डॉ. दहिफळे, डॉ. विनोद पटारे, डॉ. अविनाश लेलकर, मेडिकल स्टोअर धारक अतुल गोड, आकाश लेलकर, अतुल गवांदे, राहुल भवार, संदीप टुपके, प्रदीप टूपके, अजिंक्य आहेर, रोहित मावळे, पारखे, लॅब असिस्टंट साबळे, दीपक पवार, पोपट बोडखे, सरकारी दवाखान्यातील गायकवाड सिस्टर, भोसले सिस्टर, अमिना सय्यद सिस्टर आधी सत्कारार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार बापूसाहेब नवले यांनी केले तर आभार मयूर पटारे यांनी मानले

Post a Comment

0 Comments